बीजिंग, 09 सप्टेंबर : लहान मुलांनी नाणं किंवा एखादी छोटी वस्तू तोंडात टाकल्याच्या किंवा गिळल्याच्या घटना आजवर आपण ऐकल्या आहेत. मात्र एखाद्या प्रौढ व्यक्तीनं असं काही केलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल. विशेष म्हणजे त्या व्यक्तीने तोंडातून नव्हे तर गुप्तांगातून एखादी वस्तू टाकली असं सांगितलं तर आणखीनच धक्का बसेल. अशीच धक्कादायक घटना घडली आहे ती चीनमध्ये.
चीनमधील (china) एका व्यक्तीने आपल्या गुदद्वारातून (Rectum) एक काचेचा ग्लास (Tumbler) आत टाकला. हा ग्लास चुकीने आत गेल्याचं त्याच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं.
हुआंग असं या व्यक्तीचं नाव आहे. 53 वर्षांच्या या व्यक्तीचं नाव आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती ग्लासने पाठीला खाजवत होती. खाजवता खाजवता चुकीने त्या व्यक्तीने ग्लास आपल्या गुदद्वारात टाकला. त्यानंतर त्याला चालायलाही त्रास होत होता. अखेर हा ग्लास काढण्यासाठी त्याला रुग्णालयात भरती व्हावं लागलं.
हे वाचा - चिकन सूप प्यायल्यानंतर महिलेचा पोटात झाला स्फोट आणि...
लूच्या दक्षिण-पश्चिम मेडिकल विश्वविद्यालयाच्या पारंपारिक चीनी चिकित्सा रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं. एक्स-रे काढला असता, हा ग्लास गुदद्वारापासून दोन इंच लांब होता. त्याची लांबी 6 सेंटीमीटर आणि व्यास 5.6 सेमी होता. या रुग्णालयातील डॉ. ली वुशेंग आणि त्यांच्या टीमने यशस्वीरित्या हा ग्लास बाहेर काढला आहे.
दरम्यान चीनमधील ही पहिलंच प्रकरण नाही तर याआधी एका 60 वर्षीय व्यक्तीच्या गुदद्वारात सात इंच लांब काचेची बाटली अडकली होती. याच रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली होती.
हे वाचा - आधी चोरला 45 हजारांचा फोन, वापरता आला नाही म्हणून मालकालाच घरी बोलवलं
याशिवाय गेल्याच महिन्यात चीनच्या डॉक्टरांनी एका रुग्णाच्या मेंदूतून तब्बल 5 इंच लांब किडा काढण्यासाठी ऑपरेशन केलं होतं. रिपोर्टनुसार, हा परजीवी गेल्या 17 वर्षांपासून त्या व्यक्तीच्या मेंदूत होता. तर मे महिन्यातही असंच एक प्रकरण समोर आलं होतं. ज्यात डोकेदुखीने त्रस्त असलेल्या महिलेच्या मेंदूत 6 इंच लांब जिवंत किडा होता, जो डॉक्टरांनी बाहेर काढला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.