वॉशिंग्टन, 10 जुलै : खरेदीला गेल्यानंतर भाव करणं आणि बचत करणं हा तसा प्रत्येक महिलांचा किंबहुना गृहिणीकडे असलेलं एक उत्तम असं कौशल्य. काटकसरीत त्यांचा हात कुणीच धरू शकत नाही. यामुळे किती तरी महिलांना कंजूस असं म्हटलं जातं. पण अमेरिकेतील एका महिलेनं आपण जगातील सर्वात जास्त काटकसर (Frugal) करणारी महिला असल्याचा दावा (Most frugal woman) केला आहे आणि खरंच ती पैसे वाचवण्यासाठी काय काय करते हे तुम्हाला माहिती पडलं तर तुम्ही तिला जगातील सर्वात कंजूस महिलाच म्हणाल.
41 वर्षांची बेकी गुइल्स (Becky Guiles). माहितीनुसार, बेकी तिचा नवरा जय (Jay), 7 वर्षांचा जॉर्ज (George) आणि 4 वर्षांचा कोल्डन (Colden) या दोन मुलांसोबत राहते. बेकीने आपली 25,000 पाउंडची नोकरी सोडली आणि गृहिणी बनून राहिली. तिनं आपल्या मुलांसोबत वेळ घालवण्याला प्राधान्य दिलं.
बेकीच्या मते, पैसे वाचवणं म्हणजे पैसे कमावणंच. पहिल्या वर्षी तिने इतकी बचत केली होती की नोकरी सोडल्याने पगार न मिळाल्याने तिचं जे नुकसान झालं त्याची भरपाई झाली होती. आपण जगातील कोणतीही वस्तू खूप स्वस्तात किंवा अगदी मोफत घेऊ शकते, असा दावा ती करते. पैसे वाचवण्यासाठी ती वेगवेगळ्या फंडे वापरते. पैसे वाचवण्याचे तिचे मार्ग पाहिले तर तुम्ही हैराणच व्हाल.
हे वाचा - VIDEO - झाड कोसळून पूर्ण घर उद्ध्वस्त; 5 महिन्यांच्या बाळाला साधं खरचटलंही नाही
बेकी आपल्या घराची सजावट स्वतः करते. ही सजावट टाकाऊपासून टिकाऊ बनवूनच करते. वस्तू खराब झाल्या तर नीटसुद्धा स्वतःच करते. हे ठिक आहे. सामान्यपणे बहुतेक लोक पैसे वाचवण्यासाठी असं करतात. पण बेकी तर याच्याही पलिकडे गेली आहे. ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल.
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण पैसे वाचवण्याच्या नादात तिने आपल्या घरातील पाणीपुरवठाही बंद केला आहे. बाहेर जो बर्फ पडतो, तो जमा करून त्याच्यापासून पाणी तयार करून ती त्या पाण्याचा वापर करते. याच बर्फाने ती दात घासते. सामान्यपणे कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन आणि भांडी घासण्यासाठी डिश वॉशर असतं. वॉशिंग मशीनमध्येच ती खराब कपडे आणि उष्टी भांडी धुते. जेणेकरून जास्त पाणी लागणार नाही आणि साबणाचा खर्चही वाचतो. पण बेकी वॉशिंग मशीनमध्येच कपडे आणि भांडी दोन्ही धुते. घरातील सदस्यांनासुद्धा ती असंच सर्व करायला लावते.
हे वाचा - लग्न राहिलं बाजूला, नवरा-नवरीने आधी जेवणावर मारला ताव; बकाबक खाताना VIDEO
अगदी खाण्याचा ती हिशेब ठेवते. जास्त खाल्ल्यावर अगदी नवऱ्याकडूनही ती खाण्याचे पैसे वसूल करते. तिचा नवरा जयने सांगितलं, "जर आम्ही मोज़ेरेला स्टिक्स (Mozzarella sticks) मागवले. त्यात चार पीस असतील आणि मी तीन पीस खाल्ले. तर बेकी म्हणते, जय तुला 75 टक्के पैसे द्यावे लागतील"
काय मग आता तुमच्या ओळखीत तर कुणी कंजूस असेल त्याच्यापेक्षा ही महिला जास्त कंजूस आहे की नाही किंवा तुम्हाला जर कुणी कंजूस म्हणत असेल तर त्या व्यक्तीसोबत ही बातमी जरूर शेअर करा, जेणेकरून तुमच्यापेक्षाही कंजूस कोणीतरी आहे, हे त्या व्यक्तीलाही समजेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.