… म्हणून रिलेशन बिघडलं तरी महिला नवऱ्यासोबतचं नातं तोडत नाहीत

नवऱ्यापासून वेगळं न होण्याचं आजही सर्वात मोठं कोणतं कारण असेल तर ते म्हणजे समाजाची भीती.

  • Share this:

समाजाची भीती- नवऱ्यापासून वेगळं न होण्याचं आजही सर्वात मोठं कोणतं कारण असेल तर ते म्हणजे समाजाची भीती. याच भीतीमुळे सुशिक्षीत महिलाही नवऱ्यापासून वेगळं राहण्याचा विचार करायला सहसा धजावत नाहीत. कारण आजही भारतीय समाजात, अयशस्वी नात्याच्या मागे महिलेलाच दोषी ठरवण्यात येतं. मात्र प्रत्येकवेळी ते खरं असतंच असं नाही.

मुलांचं भविष्य- अनेक महिल्या आपल्या मुलांच्या भविष्याकडे पाहून गप्प बसतात. त्यांना सतत असं वाटत असतं की, नवऱ्याला सोडलं तर त्याचा वाईट परिणाम मुलांवर होईल.

आर्थिक कमकुवतपणा- आपल्या समाजात आजही अशी अनेक घरं आहेत जिथे महिला कमवत नाहीत. त्यामुळे नवऱ्याला सोडून राहण्याचा विचार केला तर आर्थिक गणिताचं काय होणार असा प्रश्न त्यांच्या मनात येतो. त्यामुळे अनेकदा इच्छा असूनही अनेक महिला आपल्या नवऱ्याला सोडत नाहीत.

प्रेम आणि आपुलकी- कोणत्याही नात्यात राहण्यासाठी प्रेम असणं आवश्यक असतं. जेव्हा एक पत्नी आपल्या पतीवर मनापासून प्रेम करत असते तेव्हा ती त्याच्या अनेक न पटणाऱ्या गोष्टींकडे कानाडोळा करते. तसेच आपण पतीला सोडलं तर त्याचं काय होईल या चिंतेत पत्नी आपल्या पतीपासून दूर राहत नाहीत.

सुधरण्याची आशा- अनेकदा महिला नात्याला अजून एक संधी देऊन बघतात. यामागे नवऱ्याला आपल्या चुकीची जाणीव होईल आणि तो सुधारेल अशी आशा असते. याच अपेक्षेमध्ये ती आपलं आयुष्य घालवते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2019 09:34 PM IST

ताज्या बातम्या