...म्हणून मच्छर तुम्हाला चावतात, जाणून घ्या त्या मागचं कारण

तुमचं रक्त गोड असेल तर मच्छर तुम्हाला सर्वात जास्त चावतात असं बोलताना तुम्ही अनेकांना ऐकलं असेल. लहान वयात तुम्हाला हे खरंही वाटलं असेल.

News18 Lokmat | Updated On: Sep 20, 2019 11:57 AM IST

...म्हणून मच्छर तुम्हाला चावतात, जाणून घ्या त्या मागचं कारण

जर तुमचं रक्त गोड असेल तर मच्छर तुम्हाला सर्वात जास्त चावतात असं बोलताना तुम्ही अनेकांना ऐकलं असेल. लहान वयात तुम्हाला हे खरंही वाटलं असेल. पण वास्तवात असं काही नसतं. मात्र ज्यांचा ओ ब्लड ग्रुप असतो त्यांच्याकडे मच्छर जास्त प्रमाणात आकर्षित होतात. या ब्लड ग्रुपमध्ये लॅक्टिक अॅसिडची मात्रा इतरांपेक्षा जास्त असते त्यामुळे मच्छर या ब्लड ग्रुपच्या व्यक्तिकडे अधिक आकर्षित होतात.

आपल्या त्वचेत लॅक्टिक अॅसिडचे तत्त्व सापडतात. जर याची मात्र आवश्यकतेपेक्षा जास्त असेल तर मच्छरांची चांदीच असते. याशिवाय फार कमी लोकांना माहीत आहे की व्यायाम केल्यानंतरही मच्छर इतर वेळेपेक्षा जास्त चावतात. शरीराचं वाढतं तापमान हे एक मोठं कारण आहे. व्यायाम करताना शरीराचं तापमान वाढतं. यामुळेच व्यायाम केल्यानंतर मच्छर जास्त चावतात.

दीर्घ श्वासामुळे होतात मच्छर आकर्षित-

दीर्घ श्वास घेण्याच्या सवयीमुळेही मच्छर तुमच्या शरीराकडे जास्त प्रमाणात आकर्षित होतात. कारण जेव्हा तुम्ही दीर्घ श्वास घेता तेव्हा तुम्ही श्वास दीर्घपणे सोडताही. शरीरातून बाहेर पडलेला कार्बन डायऑक्साइडमध्ये आपल्या शरीराचा वास असतो. यामुळेच मच्छर तुमच्या शरीराकडे आकर्षित होतात. जेवढा दीर्घ श्वास तेवढं मच्छरांसाठी अंदाज लावणं सोप्पं असतं.

गरोदरपणात चावतात जास्त मच्छर-

Loading...

ज्या महिला गरोदर असतात त्यांना इतरांच्या तुलनेत जास्त मच्छर चावतात. याचं मुख्य कारण म्हणजे गरोदर महिलांचं तापमान हे इतरांच्या तुलनेत जास्त असतं. यामुळेच त्यांना मच्छर जास्त चावतात.

3 हजारहून जास्त आहेत मच्छरांचे प्रकार-

American Mosquito Control Association च्या मते, जगभरात 3 हजारांहून जास्त प्रकारचे मच्छर आहेत. यातले काही मच्छर हे इतके घातक आहेत की ते चावल्यावर मृत्यूही येऊ शकतो.

मादा मच्छरच चावतात-

हेही एक सत्य आहे की नर मच्छर कधीच चावत नाही. फक्त मादा मच्छरच चावते. आपल्या शरीरातील रक्तामुळे मादा मच्छरची अंडी लवकर तयार होतात. त्यामुळे मच्छरांची संख्या वाढण्यातही माणसांचाच हात आहे.

डेंग्यूपासून वाचण्यासाठी या शहरात विकलं जातंय 200 रुपयांनी शेळीचं दूध

बेडवर चुकूनही करू नका ही एक गोष्ट, आयुष्यभर रहाल अयशस्वी!

या इशाऱ्यांनी समजून जा मुलगा तुमच्याशी फ्लर्ट करतो की नाही!

फायदेशीर आहे हे गवत, मधुमेह- डोळ्यांच्या आजारावर ठरतं रामबाण उपाय

SPECIAL REPORT: ..तरीही मीच जिंकणार! पंकजा मुंडेंचं राष्ट्रवादी काँग्रेसला थेट आव्हान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2019 11:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...