मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी हे सोपे उपाय आहेत फायदेशीर, 10 वर्षे कमी वयाचे दिसाल

चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी हे सोपे उपाय आहेत फायदेशीर, 10 वर्षे कमी वयाचे दिसाल

How To Prevent Winkles At Home: एका ठराविक वयानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या येणं ही सामान्य गोष्ट आहे. पण काही लोकांना वयाच्या आधीच चेहऱ्यावर बारीक रेषा (सुरकुत्या) दिसू लागतात. तसेच चेहरा काळा पडणे किंवा काळपट डाग यामुळे वयाच्या तुलनेत आपण जास्त वयस्क दिसू लागतो.

पुढे वाचा ...

मुंबई, 02 डिसेंबर : एका ठराविक वयानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या येणं ही सामान्य गोष्ट आहे. पण काही लोकांना वयाच्या आधीच चेहऱ्यावर बारीक रेषा (सुरकुत्या) दिसू लागतात. तसेच चेहरा काळा पडणे किंवा काळपट डाग यामुळे वयाच्या तुलनेत आपण जास्त वयस्क दिसू लागतो. याची तशी अनेक कारणे आहेत. यापैकी एक म्हणजे वाईट जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी. याचा परिणाम सर्वप्रथम आपल्या त्वचेवर दिसून येतो. मग चेहऱ्यावरील सुरकुत्या असोत किंवा काळे डाग, त्या घालवणे सोपे काम नाही. सतत वाढणाऱ्या तणावाचाही परिणाम चेहऱ्याच्या त्वचेवरही होतो. जर तुम्हालाही या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर काही घरगुती उपाय करून तुम्ही या समस्येवर (How To Prevent Winkles With Home Remedy) मात करू शकता.

सुरकुत्या दूर करण्यासाठी या टिप्स फॉलो करा (Beauty Tips for Wrinkle at Home)

1. चेहरा कोरडा होऊ नये

चेहऱ्याला सुरकुत्यांपासून वाचवण्यासाठी चेहऱ्याला अगोदर कोरडेपणापासून वाचवणे आवश्यक आहे. यासाठी दिवसातून दोनदा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून मॉइश्चरायझ करा. तुमचा चेहरा स्वच्छ करण्यासाठी फक्त सौम्य क्लीन्सर वापरा. जेव्हाही तुम्ही उन्हात बाहेर जाल तेव्हा 30 पेक्षा जास्त एसपीएफ असलेले सनस्क्रीन लावून त्वचेचे उन्हापासून संरक्षण करा.

हे वाचा - Sleep Disorders : तुम्हालाही झोपेत बडबडण्याची सवय आहे का? जीवनशैलीत असा बदल ठरेल गुणकारी

2. योग्य झोप आवश्यक

चांगल्या त्वचेसाठी गाढ झोप लागणं आवश्यक आहे. झोपल्याने तुमचे संपूर्ण शरीर दुरुस्त होते आणि त्वचाही उजळते. रात्री किमान 8 तासांची झोप घ्यावी. झोपेमुळे तणावाचा प्रभावही कमी होतो आणि त्वचेवर अवेळी सुरकुत्या पडत नाहीत.

3. खाण्या-पिण्याच्या सवयी

आहारात शक्यतो फळे आणि भाज्यांचा समावेश करा. सकस आहारामुळे त्वचा चमकदार होते. शक्यतो कोशिंबीर आणि दही यांचा आहारात समावेश आवर्जुन करा. सकाळी नाश्त्यात ड्रायफ्रुट्स खा आणि दिवसभर भरपूर पाणी प्यावे, असे केल्याने त्वचा दीर्घकाळ तरुण राहते.

हे वाचा - Healthy Life: हा टेस्टी ब्रेकफास्ट आहे अनुष्का शर्माच्या सडपातळ आरोग्याचे गुपित

4. तणाव टाळा

तणाव तुमच्या त्वचेसाठी खूप हानिकारक आहे. शक्यतोवर स्वतःवरील ताण दूर करा. खरं तर, जेव्हा तुम्ही तणावाखाली असता तेव्हा शरीरात कॉर्टिसोल हार्मोनचे अधिक उत्पादन होते ज्यामुळे कोलेजन कमी होते. आपल्या त्वचेला तजेलदार आणि चमकदार बनवण्‍यात कोलेजन महत्त्वाची भूमिका बजावते.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Beauty tips, Skin care