• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • YouTube VIDEO पाहून त्वचेवर करू नका भलते प्रयोग; काही DIY करतील मोठं नुकसान

YouTube VIDEO पाहून त्वचेवर करू नका भलते प्रयोग; काही DIY करतील मोठं नुकसान

पिंपल्सवर उपाय म्हणून महिला टूथपेस्ट चेहऱ्याला लावतात.

पिंपल्सवर उपाय म्हणून महिला टूथपेस्ट चेहऱ्याला लावतात.

इंटरनेटबरोबर इतर कोणाच्या सांगण्यावरून देखील आपण चांगल्या-वाईट परिणामाचा (Side Effect) विचार न करता काही होम रेमेडीज (Home Remedies) ट्राय करतो.

  • Share this:
    दिल्ली, 29 जून: बऱ्याच जणांना वेगळ्या प्रकारचे स्किन प्रॉब्लेम (Skin Problem) असतात. पिंपल्स,सुरकुत्या, डार्क सर्कल,काळे डाग अशा प्रकारच्या त्रासांमध्ये फार कमी वेळा डॉक्टरांचा सल्ला (Doctor Advice) घेतो. उलट सहजपणे घरगुती उपाय (Home Remedies) करतो किंवा इंटरनेटवरून माहिती घेऊन व्हीडिओ (DIY Video) बघून चेहऱ्यावर प्रयोग करायची सवय बऱ्याच मुलींना आणि महिलांना असते. कधीकधी इंटरनेटवर मिळालेल्या माहितीमुळे आपण असे प्रोडक्ट आपल्या चेहऱ्यावर लावतो की,ज्यामुळे आपल्या चेहऱ्याचं नुकसान होतं. इंटरनेटबरोबर इतर कोणाच्या सांगण्यावरून देखील आपण चांगल्या-वाईट परिणामाचा (Side Effect) विचार न करता काही होम रेमेडीज (Home Remedies)  ट्राय करतो. त्याचे दुष्परिणाम चेहऱ्यावर भयंकर होतात. 6 प्रकारच्या होम रेमेडी कधीही उपयोगात आणू नयेत असा सल्ला काही स्किन स्पेशलीस्ट देतात. (वाह वाह ताज! टाटा ग्रुपच्या 'Taj' हॉटेल्सचा अटकेपार झेंडा) पिंपल्स फोडणे काही महिलांना आपल्या चेहऱ्यावर आलेले पिंपल्स फोडायची सवय असते. चेहऱ्यावर येणाऱ्या पिंपल्समध्ये ब्लॅकहेड्स असतात. ते काढल्यावर पिंपल्स बऱ्या होतात. असा समज असल्यामुळे बरेच जण घरीच आपले पिंपल्स फोडण्याचा प्रयत्न करतात. मात्र, यामुळे मोठी जखम होऊ शकते. म्हणून पिंपल्स फोडू नयेत. (कोरोना लशीची कमाल! लस घेताच लकवा मारलेल्या शरीरात हालचाल; रुग्णाचा दावा) टूथपेस्ट पिंपल्सवर उपाय म्हणून महिला टूथपेस्ट चेहऱ्याला लावतात. हा घरगुती उपाय बऱ्याच महिला वापरतात. कधीकधी या संदर्भातले व्हीडिओ बघून आपल्या चेहऱ्यावर टूथपेस्ट लावतात. मात्र, हा शुद्ध मूर्खपणा आहे. या पेस्टमध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड असतं. टूथपेस्ट जास्त वेळा त्वचेवर लावल्यास त्याचे वाईट परिणाम देखील होऊ शकतात. भरपूर पाणी पिणे भरपूर पाणी पिणे आरोग्यासाठी चांगलं असतं. त्यामुळे आपल्या शरीर हायड्रेट होतं. आपली ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. मात्र पिंपल्स बऱ्या होण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी पाणी प्यावं मात्र, याचा पिंपल्सवर काही परिणाम होत नाही. (तणावामुळे हैराण आहात? 'या' 5 नैसर्गिक वस्तू Stress करतील दूर; औषधाची गरज नाही) एक्सफोलिएटरचा नियमित वापर चेहऱ्यावर एक्सफोलिएटरचा वापरणे फायदेशीर आहे. मात्र, सतत वापराने चेहऱ्याचं नुकसान होऊ शकतं. एक्सफोलिएटरचा वापर आठवड्यातून एकदाच करावा. याचा सतत वापर केलातर त्वचा सेन्सिटिव्ह होते. त्यामुळे त्वचेवर आणखीन पिंपल्स येऊ शकतात. नारळाचं तेल बऱ्याच महिलांना वाटतं की क्लिंजीगसाठी चेहऱ्यावर नारळाचं तेल वापरता येऊ शकतं. काहीजण नारळाचे तेल मॉश्चरायझर म्हणूनही वापरतात. मात्र, तेलामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. नारळाच्या तेलामध्ये फॅटी ऍसिड भरपूर असतं. त्यामध्ये ऍन्टीबॅक्टेरियल आणि ऍन्टीइंफ्लेमेटरी  गुण असतात. मात्र, दररोज त्याचा वापर करू नये. (सावधान! कोरोनाचा धोका पुन्हा वाढला पावसाळ्यात अशी घ्या स्वतःची काळजी) ऑयली त्वचेसाठी मॉश्चरायझर तेलकट त्वचेसाठी मॉश्चरायझर लावू नये या समजामुळे महिला चेहऱ्याला मॉश्चरायझर लावत नाहीत. पण, ऑयली त्वचासुद्धा हायड्रेट होते. त्यामुळे ऑयली त्वचेवर वॉटर बेस्ट मॉश्चरायझरचा वापर करू शकता.
    Published by:News18 Desk
    First published: