पन्नाशीतही तरुण दिसण्यासाठी फॉलो करा या टिप्स 1. चहा किंवा कॉफीऐवजी तुमचा आहार पाण्याने सुरू करा. कारण पाणी त्वचेचे टिश्यू पुन्हा भरण्यास मदत करते. 2. रोज बदाम आणि अक्रोड खा. यामध्ये असलेले व्हिटॅमिन E त्वचेचे पोषण करते आणि मुक्त रॅडिकल्सपासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करते. 3. ओमेगा 3 फॅटी ऍसिडसाठी भोपळ्याच्या बिया, अंबाडीच्या बिया खा. कारण ते त्वचेच्या तेलाचे उत्पादन नियंत्रित करण्यास आणि मुरुमांपासून बचाव करण्यास मदत करतात. 4. प्रोटीनयुक्त जेवण घ्या. कारण ते खराब झालेले त्वचेचे टिश्यू बरे करण्यास आणि दुरुस्त करण्यास मदत करते. Olive Oil Benefits : ऑलिव्ह ऑईलने करा बॉडी मसाज, बॉडी-माईंड रिलॅक्सेशनसोबत डायबिटीसाठीही फायदेशीर 5. आठवड्यातून 5 दिवस 20 मिनिटे स्ट्रेंथ ट्रेनिंग गरजेची आहे. कारण यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो ज्यामुळे शरीराला अधिक पोषक द्रव्ये पोहोचवण्यास मदत होते. 6. दिवसभर सक्रिय रहा. कारण व्यायामामुळे त्वचेच्या पेशींचे पोषण होण्यास मदत होते. 7. हायड्रेटेड रहा कारण योग्य हायड्रेशनमुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. ज्यामुळे तुमची त्वचा ग्लोइंग आणि हायड्रेटेड होते. 8. दररोज 2 फळे आणि 3 भाज्या खा. हे त्वचेला अँटिऑक्सिडेंट आणि संश्लेषित कोलेजन प्रदान करण्यास मदत करते.View this post on Instagram
Makeup Tips : कॉम्पॅक्ट आणि लूज पावडरमध्ये काय फरक असतो? ते केव्हा आणि कसे वापरावे?
9. पेशींना ताजे ऑक्सिजनयुक्त रक्त देऊन त्वचेचे पोषण करण्यासाठी, सकाळी उठल्यानंतर 5-7 मिनिटे दीर्घ श्वास घेणे. 10. व्हिटॅमिन डी साठी 10-15 मिनिटे सूर्यप्रकाश घ्या.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beauty tips, Health Tips, Lifestyle, Skin care