Home /News /lifestyle /

Beauty Tips: मान काळी पडली असेल तर करा कोरफड जेलचा वापर; होईल फायदा

Beauty Tips: मान काळी पडली असेल तर करा कोरफड जेलचा वापर; होईल फायदा

अ‍ॅलो व्हेरा जेलचा (Alovera Gel) उपयोग करून तुम्ही तुमची मानही तुमच्या चेहऱ्याप्रमाणेच सुंदर आणि डागविरहित बनवू शकता. जाणून घ्या फायदे.

मुंबई, 29 जून:  सहसा कोणीही व्यक्ती चेहरा आणि हातापायांची खूप काळजी घेते. त्यांची अगदी नीट देखभाल करते; पण मानेकडे मात्र अनेकांचं दुर्लक्ष होतं. परिणामी मान आणि मानेच्या आजूबाजूच्या भागातली त्वचा हळूहळू काळी पडायला लागते. त्यावर मळ जमायला लागतो. जेव्हा ही गोष्ट आपल्या लक्षात येते, तोपर्यंत हा मळ इतका घट्ट झालेला असतो, की तो पटकन निघत नाही. हा मळ साफ करण्यासाठी काही जण वेगवेगळ्या ट्रीटमेंट्सही घेतात; पण त्यामुळे त्वचेचं कदाचित आणखी नुकसानही होण्याची शक्यता असते; पण तुम्ही अगदी घरगुती उपायांच्या साह्याने ही समस्या अगदी सहज दूर करू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त अ‍ॅलो व्हेरा म्हणजेच्या कोरफडीची जेल वापरण्याची गरज आहे. कोरफड जेल त्वचेच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. अ‍ॅलो व्हेरा जेलचा (Alovera Gel) उपयोग करून तुम्ही तुमची मानही तुमच्या चेहऱ्याप्रमाणेच सुंदर आणि डागविरहित बनवू शकता. अ‍ॅलो व्हेराबरोबर लिंबाचा वापर एक चमचा कोरफड जेलमध्ये अर्ध्या लिंबाचा रस (Alovera Gel And Lemon Juice) मिसळा. यामध्ये तुम्हाला हवं असल्यास मध (Honey) आणि गुलाबपाणीही (Rose Water) घालू शकता. हे सगळं मिश्रण एकत्र करा आणि तुमच्या मानेवर सगळीकडे अगदी नीट लावा. 15 मिनिटांनी हे पाण्यानं धुऊन टाका. आठवड्यातून हे 2-3 वेळा लावल्यास तुम्हाला बराच फरक पडलेला दिसू शकेल. हेही वाचा - Essential Nutrition: रोजच्या जेवणातून ही 6 पोषक तत्वे मिळायला हवीत; निरोगी आयुष्याचे सोपे गुपित कोरफड आणि हळद 3 चमचे कोरफड जेलमध्ये चिमूटभर हळद (Turmeric) आणि अर्धा चमचा बेसन (Besan) व्यवस्थित मिसळा. ही पेस्ट मानेवर लावा आणि अर्ध्या तासाने पाण्याने धुऊन टाका. आठवड्यातून तीन वेळा ही पेस्ट लावल्यास मानेवरचे डाग लवकरच निघून जातील आणि मान अगदी स्वच्छ होईल. कोरफड आणि काकडी 2 चमचे कोरफड जेलमध्ये एक चमचा दही (Curd) आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. हे मिश्रण मानेवर नीट लावा. अर्ध्या तासाने हे मिश्रण धुऊन टाका. त्याचा चांगला उपयोग होतो. कोरफड जेल आणि मुलतानी माती कोरफड जेलमध्ये मुलतानी माती (Multani Mitti) आणि गुलाबपाणी मिसळा आणि ही पेस्ट मानेवर लावा. अर्ध्या तासाने कोमट पाण्याने मान स्वच्छ धुऊन टाका. यामुळे मानेचा काळेपणा अगदी आरामात नाहीसा होतो. हे घरगुती उपाय प्रभावी ठरतात. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यामुळे काही अपाय होत नाही. त्यामुळे मान स्वच्छ करण्यासाठी आणखी बाहेरचे कोणतेही वेगळे उपचार करण्याची गरज भासत नाही.
First published:

Tags: Beauty tips, Lifestyle

पुढील बातम्या