मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

विनामेकअपही तुम्ही सुंदर दिसू शकता; नैसर्गिक सौंदर्य वाढवण्याचे हे आहेत सोपे उपाय

विनामेकअपही तुम्ही सुंदर दिसू शकता; नैसर्गिक सौंदर्य वाढवण्याचे हे आहेत सोपे उपाय

Beauty Tips: मेकअपमुळं अनेकांच्या त्वचेला पुरळ, चट्टे, खाज येणे असे साईड इफेक्टस होतात. तर, अनेक महिलांना नैसर्गिक (Natural) दिसणं आवडतं. तुमचीही नैसर्गिकरित्या सुंदर दिसण्याची इच्छा असेल तर, काही सवयी बदलून तुम्ही चांगली त्वचा मिळवू शकता.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : सुंदर दिसण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे मेकअप (Makeup) करणं. पण प्रत्येकाला मेकअप करणं आवडत नाही. मेकअपमुळं अनेकांच्या त्वचेला पुरळ, चट्टे, खाज येणे असे साईड इफेक्टस होतात. तर, अनेक महिलांना नैसर्गिक (Natural) दिसणं आवडतं. तुमचीही नैसर्गिकरित्या सुंदर दिसण्याची इच्छा असेल तर, काही सवयी बदलून तुम्ही चांगली त्वचा मिळवू शकता. निरोगी त्वचेसाठी, त्वचेची काळजी घेण्याच्या (Makeup) उद्देशानं दिनचर्या पाळणे आणि आहाराकडे लक्ष (Natural Ways To Look Beautiful) देणे महत्त्वाचे आहे.

यासाठी तुम्हाला ना बाजारातून महाग उत्पादने विकत घेण्याची गरज आहे, ना तुम्हाला रसायनयुक्त वस्तूंचा वापर करण्याची गरज आहे. तुम्ही कोणत्या वस्तूंचा घरच्या घरी वापर करून नैसर्गिकरित्या सुंदर बनू शकता याची आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

तांदूळ आणि मध स्क्रब (Scrub)

त्वचेची काळजी घेण्यासाठी स्क्रबिंग ही एक आवश्यक प्रक्रिया आहे. त्याच्या मदतीने, मृत त्वचा सहज काढली जाऊ शकते. यामुळं नवी तुकतुकीत त्वचा बाहेर येऊ शकेल. यासाठी बाजारात उपलब्ध रासायनिक स्क्रबऐवजी तांदूळ आणि मध वापरा. तांदळामध्ये अमीनो अ‌ॅसिड, अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वं, खनिजं आदी असतात. हे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. तर, मधात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. ते त्वचेला कोणत्याही प्रकारच्या अ‌ॅलर्जीपासून वाचवतात. याशिवाय, ते त्वचेत ओलावा ठेवण्यास मदत करतं. हा फेस पॅक बनवण्यासाठी एक चमचा तांदळाचं पीठ आणि २ चमचे मध मिसळून चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. 2-3 मिनीटे हलक्या हातानं मालिश करा आणि 10 मिनिटं तसंच ठेवा. यानंतर चेहरा पाण्यानं धुवा.

हे वाचा - ज्येष्ठ नागरिकाला दंश करून शेजारीच लपला कोब्रा, नाग पकडण्यासाठी आली JCB; पाहा VIDEO

बेकिंग सोडासह छिद्र स्वच्छ करा

बेकिंग सोड्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट असतं, जे त्वचेच्या छिद्रातून व्हाईटहेड्स आणि ब्लॅकहेड्स सहज बाहेर काढण्याचं काम करते. एवढंच नव्हे तर, त्वचेचा पीएच स्तर राखण्यासही मदत होते. ते वापरण्यासाठी, एका वाडग्यात फक्त 2 चमचे बेकिंग सोडा टाका आणि अर्धा चमचा पाणी मिसळा. ते व्हाईटहेड्स आणि ब्लॅकहेड्स असलेल्या जागी लावा आणि 15 मिनिटे सुकू द्या. नंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवा.

हे वाचा - सैतानाचा अवतार सांगत महिलेला नग्न करून बळी देण्याचा प्रयत्न, बारामतील घटना

कोरफड आणि काकडीने डार्क सर्कल काढून टाका

डोळ्यांखाली असलेली काळी वर्तुळं कमी करण्यासाठी काकडी आणि कोरफडीचा वापर करा. दोघांचा रस एका भांड्यात काढा आणि कापसासह चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटांनंतर धुवा.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही)

First published:

Tags: Beauty tips, Health Tips