Home /News /lifestyle /

चेहरा Bleach करताय? होणारी जळजळ थांबवायची असेल तर अशाप्रकारे घ्या काळजी

चेहरा Bleach करताय? होणारी जळजळ थांबवायची असेल तर अशाप्रकारे घ्या काळजी

चेहरा ब्लीच केल्यावर काहीवेळा जळजळ होते.

चेहरा ब्लीच केल्यावर काहीवेळा जळजळ होते.

चेहरा ब्लीच (Bleach) केल्यावर रॅशेस किंवा जळजळ होत असेल तर, या उपायाने (Remedies) थंडावा मिळतो.

    नवी दिल्ली, 04 जुलै: प्रत्येकाची त्वचा नितळ सुंदर नसते. काहींना पिंपल्स प्रॉब्लेम, चेहऱ्यावरचे डाग, डार्क सर्कल असतात. तर काही महिलांना चेहऱ्यावर जास्त केस म्हणजे ‘लव’ (Hair On Face) असते. कितीही मेकअप केला तरी त्यांचे हे केस झाकले जात नाहीत. त्यामुळे अशा मुली, महिला ब्युटी पार्लरमध्ये (Beauty Parlour) जाऊन चेहऱ्यावर ब्लीच करतात. चेहऱ्यावरील नको असलेले केस लपवण्यासाठी आणि त्वचा त्वरीत चमकदार (Skin Shine) करण्यासाठी हा सर्वात सोपा उपाय आहे. चेहऱ्यावरच टॅनिंग (Tanning) कमी होतं. ब्लीच (Bleach) करणं सोपं असल्याने घरच्या घरी मुली ब्लीच करतात. पण,घरी ब्लीच करा किंवा पार्लरमध्ये त्यानंतरही चेहऱ्याची काळजी घ्यावी लागते. मिल्क क्युब चेहरा ब्लीच केल्यावर काहीवेळा जळजळ होते. जळजळ होत असेल तर, ब्लीचिंगनंतर त्वचेला थंडावा देण्यासाठी दूध किंवा मिल्क क्युब वापरता येतील. यासाठी कापसाच्या बोळ्यात कच्चं दूध घेऊन हलक्या हाताने तोंडावर लावा. 15 मिनिटांनंतर चेहरा पाण्याने धुवा. एका बाउलमध्ये कच्च दूध आणि पाणी एकत्र करा. फ्रिजरमध्ये ठेवून क्युब बनवा. ब्लीच केल्यानंतर क्युबने चेहऱ्यावर मसाज करा. ब्लीचमुळे होणारी जळजळही दूर होईल, त्वचेला थंडावा देण्यासोबतच चेहऱ्याचा रंग उजळवण्यासाठीही मदत करेल. (हे वाचा- केसांच्या सगळ्या समस्या संपवणारे ‘हे’ उपाय; एकदा करूनच पाहा) कोरफड जेल मसाज चेहर्‍यावर ब्लीच केल्यावर कोरफडीच्या जेलने चेहऱ्यावर मसाज करा किंवा जेल आईस ट्रेमध्ये ठेवून त्याचे आईस क्युब तयार करा. याकरता मार्केटमध्ये मिळणारं जेल किंवा कोरफडच्या ताज्या पानांचा गर काढून वापरा. त्यामुळे त्वरित थंडावा मिळतो आणि ब्लीचिंगचे दुष्परिणाम होत नाही. त्वचेवर झालेलं इन्फेक्शन दूर करण्यासाठी कोरफड  अत्यंत फायदेशीर ठरते. कोरफड वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करावी. नारळाच दूध किंवा पाण्याचा वापर ब्लीचिंगमुळे त्वचेवर हलके रॅशेस किंवा पुरळ उठलं असेल तर चेहऱ्यावर नारळाचं दूध किंवा नारळाचं पाणी वापरू शकता. यासाठी कॉटन पॅडमध्ये नारळ पाणी किंवा नारळाचं दूध घेऊन लावा. 15 मिनिटांनंतर चेहरा पाण्याने धुवा. त्वचा चमकदार होईल. स्किन टोनर म्हणून नारळाच्या पाण्याचा वापर करू शकता. याशिवाय नारळपाणी नियमितपणे प्यायल्याने त्वचेमध्ये चमकही येते. (हे वाचा- काही लोकांना असते रोटी, चपाती, पोळीचीही अ‍ॅलर्जी; Gluten Sensitivity कशी ओळखाल?) चंदन पॅक चंदनात अँटी इफ्लामेट्री आणि अँटी बॅक्टेरीयल गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेची आग किंवा रॅशेस दूर होण्यास मदत होते. चेहऱ्यावर ब्लीच केल्यानंतर चंदन फेस पॅक वापरू शकता. यासाठी चंदन पावडरमध्ये गुलाबपाणी मिसळा आणि लावा. 15 मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. हळद आणि दूध हळदमध्ये ऍन्टीसेप्टिक गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचेला कोणतंही नुकसान होण्यापासून वाचवतात. ब्लीच झाल्यानंतर चेहऱ्यावर हळद लावल्याने त्वचा चमकदार बनते. 4 चमचे कच्च्या दुधात 1 चिमूटभर हळद घाला आणि लावा. 15 मिनिटांना चेहरा पाण्याने धुवा. (हे वाचा- पुरुष आणि स्त्रियांना वेगवेगळ्या वेळी होते Sex ची इच्छा; चुकीच्या वेळी केल्यास…) बटाट्याची साल चेहऱ्यावर ब्लीच लावल्यावर बटाट्याची साल लावली तर थंडावा मिळतो. बटाट्याची साल लावून 10 ते 15 मिनिटं ठेवा. थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे जळजळ आणि रॅशेसची समस्या दूर होते. ब्लीचमुळे आलेल्या रॅशेसवर कापसाच्या मदतीने लॅव्हेंडर ऑईल लावा.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Skin, Skin care

    पुढील बातम्या