मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

प्रसूतीनंतर तुमच्या चेहऱ्यावर काळसर ठिपके येतायत? अशी घ्या त्वचेची काळजी

प्रसूतीनंतर तुमच्या चेहऱ्यावर काळसर ठिपके येतायत? अशी घ्या त्वचेची काळजी

प्रसूतीनंतर (Post Partum) विशेष काळजी घेतली नाही तर चेहऱ्यावर पुरळ, पिग्मेंटेशन, स्ट्रेच मार्क्स, डोळ्यांभोवती फुगीरपणा, काळी वर्तुळं आदी समस्या उद्भवू शकतात. ज्यामुळं त्वचेचं सौंदर्य कायमचं संपुष्टात येऊ शकतं. याचं शरीरात संप्रेरकांमध्ये जलद गतीनं होणारे बदल (हार्मोनल चेंजेस) हे मुख्य कारण आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : साधारणपणे असं म्हटलं जातं की आई झाल्यावर (Post Partum Skin Care Tips) त्वचेवर एक विशेष चमक येते आणि स्त्रिया पूर्वीपेक्षा अधिक सुंदर दिसू लागतात. पण प्रत्येकासोबत असं होतंच असं नाही. प्रसूतीनंतर (Post Partum) विशेष काळजी घेतली नाही तर चेहऱ्यावर पुरळ, पिग्मेंटेशन, स्ट्रेच मार्क्स, डोळ्यांभोवती फुगीरपणा, काळी वर्तुळं आदी समस्या उद्भवू शकतात. ज्यामुळं त्वचेचं सौंदर्य कायमचं संपुष्टात येऊ शकतं. याचं शरीरात संप्रेरकांमध्ये जलद गतीनं होणारे बदल (हार्मोनल चेंजेस) हे मुख्य कारण आहे. याव्यतिरिक्त, आहार आणि शारीरिक थकवादेखील त्वचेवर मोठ्या प्रमाणात परिणाम करतो. अशा परिस्थितीत, प्रसूतीनंतर त्वचेची योग्य काळजी घेणे खूप महत्वाचं आहे. तर प्रसूतीनंतर तुम्ही तुमच्या त्वचेची विशेष काळजी कशी घेऊ शकता त्याविषयी तुम्हाला काही टिप्स देत आहोत.

1. पाणी किंवा पातळ पदार्थांचं सेवन

चांगल्या त्वचेसाठी शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखणं खूप महत्वाचं आहे. बाळाला स्तनपान दिल्यामुळे शरीरात पाण्याची पातळी कमी होते आणि ही  कमतरता भरून काढली नाही तर डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. त्याचा त्वचेवरही परिणाम होतो. त्यामुळं शक्य तितकं पाणी, नारळाचं पाणी, रस, सूप इत्यादी भरपूर प्या.

2. मिल्क आइस क्यूब

बाळाची काळजी घेण्यात बराच वेळ जात असल्यामुळं तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढणं सोपं जाणार नाही. अशा परिस्थितीत कच्चं दूध बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा आणि ते गोठवा. वेळ मिळेल तेव्हा दूधाचा आईस क्यूब चेहऱ्यावर फिरवत जा. यामुळं त्वचा मुलायम राहील.

3. क्लीनिंग, टोनिंग, मॉइश्चराइझ करणं आवश्यक

नेहमीप्रमाणं आपल्या त्वचेची काळजी घेत जा. सकाळी आणि रात्री फेशियल क्लीनरनं चेहरा स्वच्छ करा आणि टोनरही लावा. शेवटी मॉइश्चराइझ करा. आपली इच्छा असल्यास, आपण घरी सफरचंद सायडर व्हिनेगर किंवा गुलाब पाणी देखील टोनर बनवून वापरू शकता.

हे वाचा - सूनेचं ते सत्य समजताच सरकली सासू-सासऱ्यांच्या पायाखालची जमीन; दुसऱ्याच क्षणी घरातून हकालपट्टी

4. आवश्यक व्यायाम

कधीकधी वजन वाढल्यामुळं चेहऱ्यावर काळसर डाग, खड्डे किंवा बारीक ठिपके (पिग्मेंटेशन) येऊ लागतात. यासाठी नियमितपणे चालणं आणि व्यायाम सुरू ठेवा. आपण डॉक्टरांचा सल्लाही घेऊ शकता.

हे वाचा - अ‍ॅम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाज लवकरच बदलणार, Ambulance च्या Siren वर वाजणार आकाशवाणीची धून

5. सनस्क्रीन

घरातून बाहेर पडताना, चांगले सनस्क्रीन लावण्यास विसरू नका आणि आपले केस आणि त्वचा स्कार्फनं झाकून ठेवा. तुम्ही रोज सनस्क्रीन वापरू शकता.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. हे उपाय लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांशी संपर्क साधा.)

First published:

Tags: Beauty tips, Pregnancy, Pregnant woman