• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Glowing Skin : घरातील या डाळीचा वापर करून चेहरा बनवा तजेलदार; जाणून घ्या ही सोपी पद्धत

Glowing Skin : घरातील या डाळीचा वापर करून चेहरा बनवा तजेलदार; जाणून घ्या ही सोपी पद्धत

विशेष म्हणजे ही डाळ सर्व प्रकारच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. जाणून घ्या त्वचेचं आरोग्य सुधारण्यासाठी लाल मसूरापासून कसे फेस पॅक बनवावेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 07 नोव्हेंबर : तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या स्वयंपाकघरात तुम्हाला सौंदर्य देऊ शकणाऱ्या वस्तूंचा खजिना आहे? माहीत नसेल तर, ही बातमी तुमच्या कामाची आहे. स्वयंपाकघरात अशा अनेक वस्तू आहेत, ज्या आरोग्यासोबतच त्वचेसाठीही खूप फायदेशीर मानल्या जातात. यापैकी एक लाल मसूर आहे. यामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त असतं, जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतं. परंतु, तुम्हाला माहीत आहे का, की याचा वापर चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी देखील केला (Masoor Dal Pack For Glowing Skin) जातो. आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, प्रथिनांचं प्रमाण जास्त असल्यानं लाल मसूरापासून बनवलेले फेस पॅक त्वचेच्या मृत पेशी काढून टाकतात आणि त्वचा चमकदार बनवतात. विशेष म्हणजे, ही डाळ सर्व प्रकारच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. जाणून घ्या त्वचेचं आरोग्य सुधारण्यासाठी लाल मसूरापासून कसे फेस पॅक बनवावेत. लाल मसूराच्या डाळीपासून बनवा फेस पॅक 1. मसूर-तांदूळ-मध फेस पॅक चार चमचे मसूर अर्धा कप पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्लेंडरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट बनवा. नंतर दोन चमचे तांदूळ बारीक करून पावडर बनवा. मसूराच्या पेस्टमध्ये एक चमचा तांदळाची पूड घाला आणि ते चांगले मिसळा. नंतर त्यात एक चमचा मध घाला. तिन्ही वस्तू नीट मिसळा. जर पेस्ट खूप घट्ट झाली असेल तर ती गुळगुळीत करण्यासाठी एक चमचा दूधदेखील घालू शकता. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटे राहू द्या. पाच मिनिटांनंतर चेहऱ्यावर हलका मसाज करून चेहरा पाण्यानं धुवा. हे वाचा - वाशिम हादरलं! लग्न लावून देत नसल्याने तरुणाला राग अनावर; जन्मदात्या बापाची कुऱ्हाडीने हत्या 2. मसूर-अलोवेरा-लिंबू फेस पॅक सर्वप्रथम लाल मसूर रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी बारीक करून त्याची पेस्ट बनवा. यानंतर त्यात एक चमचा एलोवेरा जेल आणि एक चमचा लिंबाचा रस घाला. हे मिश्रण चांगले मिसळा. नंतर ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. 20 मिनिटं तसंच राहू द्या. चेहरा धुण्यापूर्वी पाच मिनिटं मसाज करा आणि नंतर चेहरा धुवा. हे वाचा - Indigo ची नवीन खास ऑफर! फक्त इतक्या दरात विमानतळावरून थेट तुमच्या घरापर्यंत पोहोचणार सामान 3. मसूर-दूध-बदाम फेस पॅक अर्धा कप दुधात चार चमचे मसूर डाळ आणि चार बदाम रात्रभर भिजत ठेवा. यानंतर दुसऱ्या दिवशी दोन्ही ब्लेंडरमध्ये टाकून बारीक करून घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि 20 मिनिटं राहू द्या. त्यानंतर 5 मिनिटं मसाज केल्यानंतर चेहरा साध्या पाण्यानं धुवा.
  Published by:News18 Desk
  First published: