Home /News /lifestyle /

फक्त रंगावर जाऊ नका तुमच्यासाठी Lipstick घेताना ही एक गोष्ट न विसरता पाहा

फक्त रंगावर जाऊ नका तुमच्यासाठी Lipstick घेताना ही एक गोष्ट न विसरता पाहा

फोटो सौजन्य - Shutterstock

फोटो सौजन्य - Shutterstock

तुमच्या ओठांसाठी कोणती लिपस्टिक आहे योग्य हे कसं ओळखायचं?

मुंबई, 30 ऑक्टोबर : महिलांच्या मेकअपमधली (Make up) अत्यावश्यक गोष्ट म्हणजे लिपस्टिक. जवळपास प्रत्येक महिलेच्या पर्समध्ये लिपस्टिक (Lipstick) आवर्जून असतेच. ही लिपस्टिक महिलांच्या ओठांचं सौंदर्य तर वाढवतेच, पण त्यामुळे चेहऱ्यावर एक टवटवीतपणाही येतो. अगदी साध्यासोप्या मेकअपमध्येही लिपस्टिक्सचे अनेक प्रकार आहेत. लिपस्टिकच्या हजारो शेड्स बाजारात मिळतात; पण त्याचबरोबर त्यांचं टेक्श्चरही वेगवेगळं असतं. कोणत्या वेळेला कोणती लिपस्टिक लावली तर तुमचं सौंदर्य अधिक खुलेल याच्या काही खास टिप्स आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 1. मॅट लिपस्टिक (Matt Lipstic) मॅट लिपस्टिक्स ओठांवर जास्त काळ राहतात. त्यामुळे तुम्ही खूप वेळासाठी किंवा अगदी दिवसभरासाठीही बाहेर जाणार असाल, तर मॅट लिपस्टिक हा उत्तम पर्याय आहे. ही लिपस्टिक चमकदार नसते आणि त्यांचे रंगही अतिभडक नसतात; मात्र तुमचे ओठ पातळ असतील किंवा फाटलेले असतील, तर मात्र मॅट लिपस्टिक शोभून दिसणार नाही. मॅट लिपस्टिक लावण्याआधी किमान 15 मिनिटं ओठांना चांगलं हायड्रेट करा. त्यानंतरच मॅट लिपस्टिक लावा. हे वाचा - चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्याचे 3 जबरदस्त उपाय, वॅक्सिंगशिवाय त्वचा चमकेल 2. क्रिमी लिपस्टिक (Creamy Lipstic) क्रिमी लिपस्टिकमुळे ओठ फ्रेश राहतात. या लिपस्टिक्स मॅट लिपस्टिकच्या तुलनेत ओठांना अधिक मॉश्चराइज ठेवतात. मॅट आणि ग्लॉसीमधल्या या लिपस्टिक्स ओठांवर दीर्घ काळ राहतात. विशेषत: थंडीमध्ये क्रिमी लिपस्टिकचा वापर आवर्जून केला जातो. उन्हाळ्यात क्रिमी लिपस्टिक्स फ्रीजमध्येच ठेवणं जास्त चांगलं. 3. ग्लॉसी लिपस्टिक (Glossy Lipstic) ग्लॉसी लिपस्टिक्समुळे तुमच्या ओठांना एक प्रकारचा चमकदार लूक येतो. कोरड्या आणि पातळ ओठांसाठी या लिपस्टिक्स हा उत्तम पर्याय आहे. यामध्ये चमक वाढवणारे घटक जास्त असतात. त्यामुळे ओठांना हायड्रेशनही मिळतं आणि ओठांना एक प्रकारचा सेमी शियर लूक येतो. हे वाचा - दिवाळीत एकदम जबरदस्त दिसायचं आहे?, मग तरुणींनो वाचा ही बातमी तेव्हा तुमच्यासाठी कोणती लिपस्टिक योग्य आहे ते ओळखा आणि तुमच्या ओठांचं सौंदर्य आणखीनच खुलवा.
First published:

Tags: Beauty tips, Fashion, Lifestyle

पुढील बातम्या