स्वयंपाकघरातले पदार्थ वापरा आणि सौंदर्य वाढवा

डार्क सर्कल्स घालवण्यासाठीदेखील काकडी फायदेशीर ठरते. काकडी डोळ्यावर ठेवली तर शरीरातली उष्णता कमी होते.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: May 9, 2017 02:34 PM IST

स्वयंपाकघरातले पदार्थ वापरा आणि सौंदर्य वाढवा

09 मे : आपण आहोत त्यापेक्षा जास्त सुंदर कसे दिसू, यासाठी प्रत्येकजणच प्रयत्न करत असतो. मग यासाठी अनेकजण भरपूर पैसेही खर्च करतात.  पण असे पैसे खर्च न करता सौंदर्यात भर टाकता आली तर..?

पाहू या काही सौंदर्यवर्धक पदार्थ-

1. लवंग

लवंग हा असा मसाला आहे जो आपल्या घरात सहज उपलब्ध असतो. लवंगेचा उपयोग चहा बनवण्यासाठी किंवा जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो. पण फार कमी लोकांना हे माहीत असेल की, चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठीही लवंग गुणकारी आहे.

कसा कराल वापर ?

Loading...

लवंगेचे 8 ते 10 तुकडे घ्या. त्यात पुदिनाची 2 पानं आणि  1 चमचा बेसन टाकून ते थंड पाण्यामध्ये मिसळा. ही तयार झालेली पेस्ट 15-20 मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवा. आणि नंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा.

2. काकडी

काकडी खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. तसंच त्वचेचे इतर दोषही दूर करता येतात.

डार्क सर्कल्स घालवण्यासाठीदेखील काकडी फायदेशीर ठरते. काकडी डोळ्यावर ठेवली तर शरीरातली उष्णता कमी होते.

3. लिंबू

लिंबाचा वापर केल्यास जेवणाची चव तर वाढतेच पण सौंदर्यात भर टाकण्यासाठीही लिंबू उपयुक्त ठरतं. व्हिटॅमिन 'सी' ची कमतरता दूर होते.

लिंबाच्या रसाने गुडघ्यांचा मसाज केल्यास गुडघ्यावरील काळेपणा दूर होतो. लिंबू चेहऱ्याला चोळलं तर चेहरा फ्रेश दिसायला लागतो.

4. बटाटा

बटाटा खाल्ल्यानं वजन वाढतं. पण बटाट्याचा रस चेहऱ्याला लावला तर सुरकुत्या कमी होतात. डार्क सर्कल्सही कमी होतात.

5. टोमॅटो

टोमॅटोच्या रसानं चेहरा तजेलदार होतो.  रस 10 ते 15 मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवावा. टोमॅटोचा रस लावणं म्हणजे घरगुती फेशियल.

6. हळद

आंबेहळद अंगाला लावून मसाज केलं की त्वचा मुलायम राहते.  एरवी लग्नात हळद लावतात. पण हळदीचा वापर नेहमी केला तर त्वचा आणि चेहरा तेजस्वी दिसतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 9, 2017 02:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...