'या' उपायांनी बनवा तुमचे ओठ गुलाबी आणि मुलायम

ओठ काळे पडू नये यासाठी भरपूर पाणी प्या. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यावर त्याचा परिणाम आपल्या ओठावरही होतो.

News18 Lokmat | Updated On: Mar 22, 2019 06:35 AM IST

'या' उपायांनी बनवा तुमचे ओठ गुलाबी आणि मुलायम

मुलायम आणि गुलाबी ओठ आपल्या चेहरा खुलवण्याचं काम करतात. प्रत्येक स्त्रीला वाटतं की, आपले ओठ सुंदर आणि गुलाबी असावेत. पण अनेकदा कमी किंमतीची किंवा जास्त केमिकल असलेली लिपस्टिक आणि लिपबाम वापरल्यामुळे आपले ओठ काळे पडतात. मग अशावेळी काळे पडलेले ओठ पुन्हा गुलाबी कसे करता येतील आणि ते पुन्हा काळे पडू नयेत म्हणून काय करता येईल याविषयी घ्या जाणून..

ओठ ड्राय होत असतील किंवा त्यांना भेगा जात असतील तर त्यावर वेळीच लक्ष द्या अन्यथा ओठ काळे पडतात. अशावेळी त्यांना वेळोवेळी लिपबाम लावा. पण कोणत्याही प्रकारची पट्रेलियम जेली वापरू नका. त्याऐवजी ग्लिसरीन, बदाम तेल किंवा व्हिटामिन-ई तेलाचा वापर करा, रात्री झोपण्यापूर्वी व्हिटामिन ई किंवा बदाम तेल लावा. यामुळे ओठांना मॉश्चराइझ केलं जातं.

ओठ काळे पडू नये यासाठी भरपूर पाणी प्या. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यावर त्याचा परिणाम आपल्या ओठावरही होतो. पाणी कमी प्यायल्यास ओठ कोरडे पडायला सुरुवात होते. त्यामुळे शरीरासोबतच ओठांनाही हायड्रेशनची गरज असते हे लक्षात ठेवा.

Loading...

ओठ काळे पडू नये यासाठी मॅट लिपस्टिक लावणं टाळा. कारण मॅट लिपस्टिकमुळे ओठ ड्राय होऊन काळे पडण्यास सुरुवात होते. याशिवाय क्रिमी फिनिशींग असलेली लिपस्टिक लावा. ज्यामुळे ओठांना ड्रायनेस येणार नाही आणि ते मॉश्चराइझही राहतील.

ओठ काळे पडल्यास त्यांना वेळोवेळी स्क्रब करायला विसरु नका. यासाठी लिंबाचा रस आणि साखरेचा वापर करा. किंवा सकाळी ब्रश केल्यावर तोच ब्रश हळूवारपणे ओठावरुन फिरवा. यामुळे ओठांवरील मृत त्वचा निघून जाते आणि ओठ गुलाबी राहण्यास मदत होते.

डार्क आणि पिग्मेंटेड लिपस्टिक ओठांचा गुलाबीपणा खेचून घेतात म्हणून लाइट किंवा न्यूड शेडच्या लिपस्टिकचा वापर करा. त्याच प्रमाणे चांगल्या ब्रँडची उत्पादने वापरा.

ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी आपण गुलाब पाण्याचाही वापर करु शकतो. याशिवाय गुलाबाच्या पाकळ्या कुस्करून त्यात एक चमचा मध घाला आणि हे मिश्रण 10-15 मिनिटं ओठांवर लावून ठेवा. त्यानंतर ओल्या कापसाने पुसून घ्या आणि मग त्यावर लिप बाम लावा.

तसेच ओठ काळे पडू नयेत यासाठी अति प्रमाणात चहा, कॉफी पिणं टाळा. तसेच धुम्रपान करु नका. हेल्दी डाएट फॉलो करा. तसेच शक्य तितक्या नैसर्गिक उत्पादनांचा वापर करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2019 06:35 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...