कसं वाढवाल केसांचं सौंदर्य?

कसं वाढवाल केसांचं सौंदर्य?

केसांचं सौंदर्य जपण्यासाठी पाहुयात काही खास घरगुती उपाय

  • Share this:

22 जून : स्त्रीचं खरं सौंदर्य हे तिच्या केसांवरून ओळखलं जातं. ज्याप्रकारे आपण आपल्या चेहऱ्यावरील सौंदर्य जपण्यासाठी वेगवेगळे मास्क वापरतो त्याचप्रकारे केसांचं सौंदर्य जपण्यासाठी पाहुयात काही खास घरगुती उपाय.

आपले रेशमी, दाट आणि सिल्की केस आपल्या सौंदर्यात आणखी भर घालतात. परंतु आजकाल बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त उत्पादनांमुळे केसांचं सौंदर्य हरवून जातं आणि ते निर्जीव व कोरडे होतात. केसांचं सौंदर्य पुन्हा मिळवण्यासाठी आणि ते टिकवून ठेवण्यासाठी आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून बऱ्याच प्रकारचे हेअर मास्क बनवू शकता.

केसातल्या कोंड्यासाठी हेअर मास्क

कोंड्यामुळे केस गळणे, केस निर्जीव होणे इत्यादी समस्या निर्माण होतात, त्याचावर उपाय म्हणून स्वयंपाकघरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासूनच आपण हेअर मास्क बनवू शकतो.

कसा बनवाल मास्क?

दोन चमचे आळशीचे तेल,  एक चमचा साखर, दोन चमचे अॅपल साइडर विनेगर, दोन चमचे हायड्रोजन पॅरॉक्साइड आणि दोन कप पाणी घ्या. त्यानंतर आळशीच्या तेलामध्ये साखर घालून हा मास्क केसांना लावून मसाज करून २० मिनिटांने शॅम्पूने धुवावा, त्यानंतर एका स्प्रे बॉटलमध्ये विनेगर,हायड्रोजन पॅरॉक्साइड आणि पाणी एकत्र करून केसांच्या मुळांवर स्प्रे करून तासभर ठवून पुन्हा पाण्याने धुवावेत. यामुळे केसातल्या कोंड्याची समस्या दूर होते.

निर्जीव आणि रफ केसांसाठी हेअर मास्क

केळं आणि अॅवोकाडो ह्या दोन फळांमुळे आपल्या केसातला निर्जीवपणा जाऊन सुंदर आणि चमकदार दिसू लागतात. हा मास्क बनवण्यासाठी एक केळं, एक अॅवोकाडो आणि ऑलिव्हचे तेल मिक्स करून केसांना 15 ते 20 मिनिटे लावून ठेवल्यानंतर केस थंड पाण्याने धुवावेत.

ऑयली केसांसाठी हेअर मास्क

आपले केस जर जास्तच ऑयली आणि चिपचिपीत होत असतील तर ती मोठी समस्या आहे. यासाठी अंड हे फारच उपयोगी ठरतं. हा मास्क बनवण्यासाठी अंड्यातील सफेद भाग, चार चमचे ग्रीन क्ले पावडर आणि दोन चमचे पाणी घेऊन मास्क तयार करा त्यानंतर अर्धा तासासाठी केसांवर लावून ठेवा आणि शॅम्पूने थंड पाण्याने धुवावेत.

First published: June 22, 2017, 2:20 PM IST

ताज्या बातम्या