सिगारेट ओढण्याने काळे झालेत ओठ, मग हे 5 उपाय कराच!

सिगारेट ओढणाऱ्या जास्तीत जास्त लोकांचे ओठ हे काळे पडतात. अनेकजण यामुळे चिंताग्रस्तही असतात.

  • Share this:

सिगारेट ओढणाऱ्या जास्तीत जास्त लोकांचे ओठ हे काळे पडतात. अनेकजण यामुळे चिंताग्रस्तही असतात. काळ्या ओठांमुळे अनेकदा त्यांना सार्वजनिक ठिकाणी लाजल्यासारखे होते, त्यामुळेच ओठांचा काळपटपणा कसा जाईल याचाच विचार ते सतत करत असतात. अशात तुम्ही पुढील काही टीप्स वापरून यापासून स्वतःची सुटका करून घेऊ शकता.

बेकिंग सोडा- बेकिंग सोड्यात एक चमचा साखर आणि काही थेंब तेल मिसळून ओठांना लावावं. 10 ते 15 सेकंदांसाठी हे मिश्रण ओठांवर स्क्रब करावं. असं काही दिवस केल्याने तुमचे ओठ पूर्वीसारखे होतील.

मध आणि साखर- एक चमचा साखरमध्ये मधाचे काही थेंब घालावे. या मिश्रणाने दोन मिनिटं ओठांचा मसाज करावा. यानंतर कोमट पाण्याने ओठ धुवावे. यानंतर ओठांवर पेट्रोलियम जेली लावायला विसरू नका.

कॉफी स्क्रब- कॉफीच्या बिया वाटून घ्या आणि त्यात दूध मिसळा. हे मिश्रण काही वेळ ओठांना लावून ठेवा, त्यानंतर मसाज करून कोमट पाण्याने ओठ धुवा. यामुळे ओठ गुलाबी होण्यास मदत मिळते.

वॅनिला स्क्रब- दोन चमचे साखर आणि त्यात अर्धा चमचा मध, वॅनिला इसेंसचे काही थेंब घाला. तसेच यात अर्धा चमचा ऑलिव्ह ऑईल घाला. 10 सेकंद या मिश्रणाने ओठांना मसाज करा. काही दिवसांमध्ये तुमच्या ओठांचा रंग बदललेला दिसेल.

ऑलिव्ह ऑईल- या तेलात एक चमचा साखर मिसळून ओठांवर लावल्याने फाटलेले ओठ अवघ्या काही दिवसांमध्ये ठीक होतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 03:33 PM IST

ताज्या बातम्या