Home /News /lifestyle /

Beauty Care Tips: सनस्क्रीन वापरताना 'ही' काळजी घ्या; अन्यथा त्वचेसाठी ठरू शकतं हानिकारक

Beauty Care Tips: सनस्क्रीन वापरताना 'ही' काळजी घ्या; अन्यथा त्वचेसाठी ठरू शकतं हानिकारक

सनस्क्रीन लोशन हानिकारक ठरू शकतात. यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अशाच काही समस्यांबद्दल माहिती घेऊ या, ज्याचं कारण सनस्क्रीन लोशन असू शकतं.

नवी दिल्ली, 17 जानेवारी: उन्हात बाहेर पडताय? मग सनस्क्रीन (Sunscreen) लावल्याशिवाय बाहेर पडू नका, असा सल्ला अनेकजण देतात. मार्केटमध्ये आज इतक्या प्रकारची सनस्क्रीन लोशन्स उपलब्ध आहेत, की त्यातलं नेमकं कुठलं वापरावं याचा गोंधळ होतो. स्वतःच्या त्वचेला मानवणारं सनस्क्रीन वापरणं योग्य असतं. अन्यथा त्याचे दुष्परिणाम ( side effects) होऊ शकतात. सनस्क्रीन तुमच्या त्वचेसाठी हानिकारकही (harmful) ठरू शकतं. 'टीव्ही 9 हिंदी'ने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. त्वचेची निगा ( skin care) राखण्यात सनस्क्रीन महत्त्वाची भूमिका बजावतं. सनस्क्रीन आपल्या शरीराला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवण्याचं काम करतं. याशिवाय सनबर्न ( sunburn), टॅनिंग आणि इतर समस्यांपासूनही मुक्ती होते. ते वय वाढण्याची (Anti-Ageing) लक्षणंदेखील कमी करते. त्वचेच्या कर्करोगाचा (Skin cancer) धोका कमी करण्यास मदत करतं. कारण सनस्क्रीनमधली केमिकल्स सूर्याची अल्ट्राव्हायोलेट किरणं थेट त्वचेपर्यंत पोहोचू देत नाहीत. यामुळे त्वचेच्या कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. सनस्क्रीनचा योग्य वापर केला न गेल्यास, तसंच त्याचा जास्त वापर केला गेला, तर सनस्क्रीन लोशन हानिकारक ठरू शकतात. यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अशाच काही समस्यांबद्दल माहिती घेऊ या, ज्याचं कारण सनस्क्रीन लोशन असू शकतं.

Low Blood Pressure Symptoms: बीपी लो झाल्याची ही 7 लक्षणं वेळीच ओळखा; आहारातील हा बदल ठरेल गुणकारी

 - अनेक जण आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार सनस्क्रीनची निवड करत नाहीत. ज्यांची त्वचा कोरडी आहे, त्यांनी मॅटचा समावेश असणारं सनस्क्रीन लावू नये; पण अनेकजण ही चूक करतात. तसंच, ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांच्याकडूनही योग्य सनस्क्रीनची निवड करताना चुका होतात. अशा चुका करणं टाळा.
- काही जण सनस्क्रीन अशा प्रकारे लावतात, की ते डोळ्यांत जातं. त्यामुळे डोळ्यांत जळजळ सुरू होते व डोळे दुखतात. सनस्क्रीन लोशन डोळ्यांत गेलं, तर डोळे ताबडतोब थंड पाण्याने धुवावेत. तसंच हलक्या हातांनी त्वचा स्वच्छ करावी. यामुळे आराम पडेल. सनस्क्रीन लावताना नेहमी काळजी घ्या, की ते डोळ्यांत जाणार नाही. - ऑनलाइन किंवा जाहिराती पाहून अनेक जण सनस्क्रीन निवडतात. हे सनस्क्रीन लावायला सुरुवात केल्यावर काही काळानंतर त्वचेवर पिंपल्स येऊ लागतात. त्यामुळे सनस्क्रीन वापरायचं असेल, तर डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच निवडावं.

Cholesterol Controlling Fruits: वाढलेलं कोलेस्ट्रॉल आणायचंय नियंत्रणात; तुमच्यासाठी संजीवनी ठरती ही 5 फळं

- सनस्क्रीन हे बाजारात उपलब्ध असलेले उत्पादन आहे. सूर्यापासून आपल्या त्वचेचं संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन प्रभावी मानलं जात असलं, तरी ते तयार करण्यासाठी टेट्रासायक्लिन आणि सल्फा फेनोथियाझिन यांसारखी केमिकल्स वापरली जातात. मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात सनस्क्रीन त्वचेवर लावल्याने त्वचेवर अॅलर्जीची समस्या उद्भवू शकते. सनस्क्रीन लावल्यानंतर अॅलर्जी झाल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Beauty tips, Lifestyle

पुढील बातम्या