नवीन लग्न झालेली जोडपी हनिमूनला जाण्यासाठी उत्सुक असतात. आपला हनिमून संस्मरणीय व्हावा, अशी त्यांची इच्छा असते. तुमचंही नुकतंच लग्न झालं असेल आणि तुम्ही हनिमूनसाठी सर्वोत्तम डेस्टिनेशन शोधत असाल, तर उत्तर भारतामध्ये असं एक ठिकाण आहे जिथे तुम्ही हनिमूनसोबत बर्फवृष्टीचाही आनंद घेऊ शकता. हे ठिकाण म्हणजे अल्मोडा. उत्तराखंडमधल्या अल्मोडा या ठिकाणाला सांस्कृतिक शहर म्हटलं जातं. तिथलं निसर्गसौंदर्य आणि सुंदर दऱ्या पाहून सर्वांनाच भुरळ पडते. अल्मोडातली कासार देवी, बिनसार, पापरशैली आणि कौसानी ही ठिकाणं हनिमूनसाठी सर्वोत्तम डेस्टिनेशन्स ठरू शकतात.
IRCTC Tour: इंडियन रेल्वेचे हे टूर पॅकेज पाहिले का? स्वस्तात फिरुन या नॉर्थ ईस्ट
अल्मोडा या सांस्कृतिक शहरापासून बिनसार हे ठिकाण सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहे. तिथल्या सुंदर दऱ्या आणि घनदाट जंगलांमधल्या हिमालय पर्वतरांगा तुम्हाला आकर्षित करतील. या वेळच्या पहिल्याच बर्फवृष्टीने बिनसार परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे. बिनसारमध्ये एक असं ठिकाण आहे जिथून केदारनाथ, चखंबा, नंदा देवी, पांचोली आणि त्रिशूल ही हिमालयातली शिखरं दिसतात.
विदेशात फिरायला जाण्याची इच्छा आहे? मग VISA नसतानाही करा 'या' देशांची सैर
अल्मोडापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर कौसानी हे ठिकाण आहे. उत्तराखंड राज्यातल्या बागेश्वर जिल्ह्यात वसलेलं हे एक खेडेगाव आहे. हे एक असं हिलस्टेशन आहे ज्याला 'मिनी स्वित्झर्लंड' असंही म्हणतात. कौसानीसारख्या ठिकाणी मोठ्या संख्येनं पर्यटक पोहोचतात. याशिवाय तिथे अनेक हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स आहेत, ज्यात आरामात राहता येऊ शकतं. या भागात बर्फवृष्टीचाही आनंद लुटता येतो. तिथे काही प्रमाणात चहाचे मळेदेखील आहेत.
अल्मोडा शहरापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर कासारदेवी आहे. या ठिकाणी भेट देण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. तिथली मंदिरं आणि तिथून दिसणारी हिमालयाची विस्तीर्ण पर्वतरांग मन मोहून टाकते. कासारदेवी मंदिर परिसरामध्ये जीपीएस 8 हा बिंदू आहे. अमेरिकेतल्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेच्या मते हा एक गुरुत्वाकर्षण बिंदू आहे. या ठिकाणी राहण्यासाठी अनेक होम स्टे, रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स आहेत.
अल्मोडापासून 10 किलोमीटर अंतरावर पापरशैली हे ठिकाण आहे. या भागात तुम्ही बर्फवृष्टीचा आनंद घेऊ शकता. याशिवाय तिथल्या घनदाट जंगलांमध्ये तुम्हाला शांतता अनुभवता येऊ शकते. एकूणच अल्मोडातल्या विविध निसर्गसंपन्न ठिकाणांमुळे हनिमूनसाठी ते सर्वोत्तम डेस्टिनेशन ठरू शकतं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Travel