मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

WOW! लखाखणाऱ्या कोळ्याचं कलरफुल जाळं; कधी पाहिलंय का तुम्ही?

WOW! लखाखणाऱ्या कोळ्याचं कलरफुल जाळं; कधी पाहिलंय का तुम्ही?

असं सुंदर कोळ्याचं जाळं असेल तर आपल्याला आपल्या घरातही हवंहवंस वाटेल.

असं सुंदर कोळ्याचं जाळं असेल तर आपल्याला आपल्या घरातही हवंहवंस वाटेल.

असं सुंदर कोळ्याचं जाळं असेल तर आपल्याला आपल्या घरातही हवंहवंस वाटेल.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 06 ऑक्टोबर : कोळ्याचं जाळं (Spider) आपल्यासाठी काही नवं नाही. आपल्या घरात कोळी (Spider video) आपलं घर बनवतात. ज्याला आपण जळमटं म्हणतो. घरातील कोपऱ्याकोपऱ्यात अशी जळमटं (Spider web) दिसतात. कितीही काढली तरी ती जळमटं पुन्हा पुन्हा येत राहतात (Spider web video) . घरात कोळ्याचं असं घर, अशी जळमटं कुणालाच नको असतात. पण या फोटोतील हे कलरफुल कोळ्याचं जाळं पाहिलं की आपल्या घरातही असं जाळं हवं, असंच वाटतं (Colurful Spider web) .

सामान्यपणे कोळ्याचं जाळं सुरुवातील पटकन डोळ्यांनी दिसून येत नाही. जसजसं ते जाळं मोठं होतं, तसतसं ते दिसू लागतं. अगदी आपला हात लागताच तुटतं इतकं हे नाजूक जाळं असतं. पण ते कोळ्याने अतिशय सुंदर पद्धतीने विणलेलं असतं, जणू काही त्याने ट्रेनिंगच घेतलं आहे. आपल्या घरातील कोळ्याच्या जाळ्यापेक्षा या फोटोतील जाळं अधिकच सुंदर दिसतं आहे.

अगदी इंद्रधन्युष्याच्या सप्तरंगाप्रमाणे हे जाळं आहे. जणू काही कोळ्याभोवती इंद्रधनुष्यच पसरला आहे असंच वाटतं. हे रंगबेरंगी जाळं आणि त्याच्या मधोमध लखाखणारा कोळी. या फोटोवरून बिलकुल नजर हटत नाही. एकटक पाहत राहावं असंच वाटतं. आता खरंच कोळी असं रंगीबेरंगी जाळं विणतो का? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल नाही का?

हे वाचा - बापरे बाप! इवल्याशा खारीचा एवढा मोठा 'कार'नामा; पाहूनच तोंडात बोटं घालाल

तर नाही हे रंगीत जाळं कोळ्याने विणलेलं नाही. म्हणजे हे जाळं आपण पाहतो तसंच सामान्य जाळं आहे. पण ही कमाल आहे ती कॅमेऱ्याची. आयएफएस अधिकारी सुसांत नंदा यांनी आपल्या ट्विटरवर हा सुंदर फोटो पोस्ट केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार कोळ्याच्या जाळ्यावर कॅमेऱ्याचा फ्लॅश पडला आणि त्यामुळे हा रेन्बो इफेक्ट दिसला.

हे वाचा - काय म्हणावं याला! चक्क प्रेशर कुकरसोबतच केलं लग्न; 4 दिवसांतच घटस्फोट

याआधी आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनी कोळी जाळं कसं विणतो याचा व्हिडीओ शेअर केला होता. अवघ्या 21 सेकंदाचा हा व्हिडीओ होता. तुम्ही स्वतःला परफेक्शनिस्ट म्हणता. पण हे नैसर्गिक परफेक्शन आहे. जिथं एक छोटासा जीव आपलं घर बनवतो आहे. या घर बनवताना एक डिग्रीचंही अंतर नाही, असं त्यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करताना लिहिलं होतं.

First published:

Tags: Viral, Viral photo