Home /News /lifestyle /

तुम्हीही लहान मुलांना मारता किंवा ओरडता का? मुलांवर असा होऊ शकतो परिणाम

तुम्हीही लहान मुलांना मारता किंवा ओरडता का? मुलांवर असा होऊ शकतो परिणाम

अनेक पालकांना वाटत मुलांना मारल तरच ते शिस्तीत आणि नियमात वागतात. पण अनेकदा याचा परिणाम मुलांच्या मनावर होतो. तसंच हा परिणाम नकारात्मक (negative impact of beating) ही असतो.

  नवी दिल्ली, 25 एप्रिल : लहान मुलांनी काही चुकीचं काम केल्यास किंवा मस्ती केल्यास बरेचसे पालक मुलांवर मोठ्याने ओरडतात किंवा त्यांच्यावर हातही उचलतात. अनेक पालकांना वाटत मुलांना मारलं, तरच ते शिस्तीत आणि नियमात वागतात. पण अनेकदा याचा परिणाम मुलांच्या मनावर होतो. तसंच हा परिणाम नकारात्मक (negative impact of beating) ही असतो. मुलांच्या मनातील भिती संपते मुलांना जर सतत मार दिला, तर ते त्यांच्या मनातील भिती संपते आणि ते चुका करण्याची जास्त शक्यता असते. जास्तीत जास्त काय तर मार दिला जाईल असा विचार करुन ते पुन्हा चुक करतात. यामुळे मुलं सुधारण्याऐवजी आणखी बिघडण्याचा धोका असतो.

  (वाचा - Pets ना सांभाळा! महासाथीच्या काळात माणसांमुळे मांजरीलाही झाला कोरोनाचा संसर्ग; संशोधनातून झालं स्पष्ट)

  मुलं पालकांपासून होऊ शकतात दूर मुलांना कधीतरी फटकारणं हे साहजिक आहे. पण हे वारंवार होत असेल तर मुलांच्या मनात पालकांविषयी रोष निर्माण होतो व पालक आपल्यावर प्रेम करत नाहीत. त्यांना आपण नको आहोत असं मुलांना वाटू लागत. परिणामी मुल पालकांपासून भावनिक दृष्ट्या दुरावले जाण्यची शक्यता असते. बंडखोरीपणा वाढतो मुलांना जर प्रत्येक गोष्ट मारुनच समजावली, तर त्यांच्यातील बंडखोरी वाढते आणि एखादी गोष्ट करु नको म्हटल्यास ते मुद्दाम करतात. आणि त्यामुळे पालकांच्या प्रत्येक गोष्टीला ते विरोध करून बंडखोरी करतात.

  (वाचा - फक्त एका क्लिकवर तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्रावर पोहोचा; Google Maps आहे मदतीला)

  मुलांमध्ये तिरस्काराची भावना निर्माण होते जर मुलांना सतत मारले तर त्याच्या मनात रोष निर्माण होतो. काही मुल बोलून किंवा अन्य पद्धतीने हा राग व्यक्त करतात. पण काही मुलं हा सगळा राग मनात धरुन ठेवतात आणि यांतून त्यांच वेगळ रुप पहायला मिळू शकते. आत्मविश्वास खालावतो मुल जर नेहमीच मार खात असतील तर त्यांच्यातील आत्मविश्वासाला तडा जातो. ते प्रत्येक गोष्टीत स्वत:ला कमी समजतात. ही भावना त्याच्या भविष्यावर नकारात्मक परिणाम करू शकते. डिप्रेशनमध्येही जाऊ शकतात मुलं - जी मुलं नेहमीच मार खात असतात त्यांच्यामध्ये डिप्रेशन वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यांच्या मनावर याचा खोलवर परिणाम होतो व परिस्थिती हाताळण्याची त्यांची क्षमता कमी होते. आणि त्यामुळेच ते डिप्रेशन मध्ये जातात.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Health, Lifestyle

  पुढील बातम्या