कोरोना संपताच कोकणात गोव्यासारखं चित्र! या 8 बीचेसवर शॅक्स येणार

कोरोना संपताच कोकणात गोव्यासारखं चित्र! या 8 बीचेसवर शॅक्स येणार

राज्यात 8 सागरी किनाऱ्यांवर गोव्याच्या धर्तीवर बीच शॅक्सना पहवानगी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. कुठे असतील हे किनारे आणि काय आहे योजना.. वाचा सविस्तर

  • Share this:

मुंबई, 25 जून : गोव्याचा बीच म्हटलं की डोळ्यासमोर येतो अथांग समुद्र आणि तो न्याहाळत वाळूत टाकलेल्या आराम खुर्चीत निवांत पहुडण्यासाठी तयार असलेल्या छत्र्या किंवा Beach Shack. आता अशा बीच शॅक्स कोकणच्या किनाऱ्यावरही दिसणार आहेत. Coronavirus चा धोका निवळला आणि लॉकडाऊनचे निर्बंध पूर्णतः उठले की, कोकण किनाऱ्यावर पर्यटनाच्या दृष्टीने नवीन सुखसोयी निर्माण होणार आहेत. राज्यात 8 सागरी किनाऱ्यांवर बीच शॅक्सना परवानगी देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet meeting) बैठकीत घेण्यात आला.

आपल्या कोकणचे सागरी किनारे निसर्गसौंदर्याच्या दृष्टीने किंचितही कमी नाहीत, पण गोव्यासारख्या सुखसोयी मात्र अद्याप कोकणापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. आता महाराष्ट्र पर्यटन विभागाने

पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी नवी योजना आखली आहे. ​राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटन वाढविण्यासाठी बीच शॅक्स (चौपाटी कुटी) उभारण्यासंदर्भातील धोरणास आज  झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या कुट्या तात्पुरत्या किंवा हंगामी स्वरुपाच्या असतील.

कुठल्या 8 किनाऱ्यांवर दिसणार शॅक्स?

​सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, आरेवारे; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, तारकर्ली ; रायगड जिल्ह्यातील वर्सोली, दिवेआगार आणि पालघर जिल्ह्यातील केळवा आणि बोर्डी या 8 किनाऱ्यांवर बीच शॅक्स उभारण्यात येतील.  या संदर्भातील अर्ज www.maharashtratourism.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असून पुढील वर्षीपासून इतर चौपाट्यांवर देखील या धोरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होईल.

VIDEO : टिक टॉकवर प्रसिद्धीसाठी 2 महिन्यांच्या बाळाला स्विमिंग पुलमध्ये फेकलं

महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहमतीने पर्यटन संचालनालयाने निश्चित केलेल्या जागेवरच तात्पुरती चौपाटी कुटी उभी करण्यासाठी परवाना देण्यात येईल.  एका चौपाटीवर कमाल 10 कुटी उभारता येतील.  स्थानिकांना ते उभारण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल.

स्थानिकांना 80 टक्के आरक्षण

या उपक्रमातून निर्माण होणाऱ्या रोजगारामध्ये स्थानिक व्यक्तींसाठी 80 टक्के जागा राखीव असतील.  या कुट्यांचे तीन वर्षाकरिता वाटप करण्यात येईल.  त्यांचा आकार 15 फूट लांबी आणि 15 फूट रुंद आणि 12 फूट उंच असेल.  गाळ्याच्या समोर बैठक व्यवस्थेसाठी 20 फूट लांब आणि 15 फूट रुंद छत टाकता येईल.  कुटी मिळणाऱ्या व्यक्तीकरिता परवान्यासाठी 15 हजार रुपये अर्जाचे ना परतावा मूल्य असेल.  तसेच या कुटीसाठी पहिल्या वर्षी 45 हजार, दुसऱ्या वर्षी 50 हजार, तिसऱ्या वर्षी 55 हजार वार्षिक शुल्क राहील.  याशिवाय 30 हजार रुपये सुरक्षा अनामत जमा करावी लागेल, जी तीन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर परत केली जाईल. चौपाटी कुटी चालविण्यासंदर्भात पर्यटन विभागाने विविध नियम घालून दिले आहेत.

Fair & Lovely तून 'फेअर' होणार गायब; 45 वर्षांनी कंपनीने घेतला मोठा निर्णय

​या चौपाटी कुटीस सकाळी 7 ते सायंकाळी 7 अशा वेळेत सुरु ठेवता येईल.  तसेच संगीताचा, गोंगाटाचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.  प्रत्येक कुटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा देखील असेल.

First published: June 25, 2020, 10:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading