मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /अनेक आजारांमध्ये गुणकारी ठरेल तमालपत्र, याचा चहा पिण्याचे आहेत फायदे

अनेक आजारांमध्ये गुणकारी ठरेल तमालपत्र, याचा चहा पिण्याचे आहेत फायदे

अँटीऑक्सिडेंट्स, विटॅमिन ए, विटॅमिन सी, आर्यन, फॉलिक अॅसिड आणि पोटॅशियमसारख्या पोषक तत्वांनी युक्त तमालपत्र शरीरासाठी गुणकारी ठरतं.

अँटीऑक्सिडेंट्स, विटॅमिन ए, विटॅमिन सी, आर्यन, फॉलिक अॅसिड आणि पोटॅशियमसारख्या पोषक तत्वांनी युक्त तमालपत्र शरीरासाठी गुणकारी ठरतं.

अँटीऑक्सिडेंट्स, विटॅमिन ए, विटॅमिन सी, आर्यन, फॉलिक अॅसिड आणि पोटॅशियमसारख्या पोषक तत्वांनी युक्त तमालपत्र शरीरासाठी गुणकारी ठरतं.

नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : तमालपत्राचा सुगंध, त्याच्या फ्लेवरमुळे जेवणाचा स्वाद वाढतो. किचनमधील हा मसाल्याचा पदार्थ केवळ जेवणाचा स्वादच वाढवत नाही, तर आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर आहे. अँटीऑक्सिडेंट्स, विटॅमिन ए, विटॅमिन सी, आर्यन, फॉलिक अॅसिड आणि पोटॅशियमसारख्या पोषक तत्वांनी युक्त तमालपत्र शरीरासाठी गुणकारी ठरतं.

अँटी-इन्फ्लेमेटरी, अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणांमुळे आयुर्वेदात तमालपत्राचा वापर केला जातो. तमालपत्रची चव हलकीशी कडू आणि ते गरम असतं. जेवणात याचा वापर करण्यासह तमालपत्रचा चहा पिणंही फायदेशीर ठरेल.

तमालपत्राचा चहा -

दोन कप पाण्यात एक मोठा किंवा दोन लहान तमालपत्र आणि अर्धा चमचा दालचिनी पावडर टाका. चार ते पाच मिनिटं ते उकळवा. गॅस बंद करुन काही मिनिटं ते झाकून ठेवा. त्यानंतर हे पाणी गाळून त्यात लिंबू किंवा मध मिसळून प्या. हा चहा आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

ह्रदय प्रत्यारोपण झालेला मुंबईतील पहिला रुग्ण लग्न बंधनात, 30 नोव्हेंबरला विवाह

काय आहेत फायदे -

- शरीरात बॅड कोलेस्ट्रोल कमी करुन रक्तातील एकूणच कोलेस्ट्रोलही कमी होण्यास मदत होते. तमालपत्रामुळे हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते.

- तमालपत्राच्या चहामुळे शरीरात स्ट्रेस हार्मोन लेवल कमी होण्यास मदत होते. तसंच व्यक्ती शांत होऊन काहीसं बर वाटण्यासही मदत होते.

Joint Pain: थंडीत सांधे, हाडे दुखण्याचा त्रास वाढलाय का? हे 5 उपाय ठरतील गुणकारी

- 2016 मध्ये जर्नल ऑफ क्लिनिकल बायोकेमिस्ट्री अँड न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित एका शोधात दिलेल्या माहितीनुसार, जे लोक टाइप-2 डायबिटीजचे रुग्ण आहेत, त्यांनी तमालपत्रचं सेवन करावं. यामुळे ग्लुकोज लेवल कमी राहण्यास त्याशिवाय इन्सुलिनचं फंक्शनही सुरळित ठेवण्यास मदत होईल.

- तमालपत्रमध्ये एक खास प्रकारचं एन्जाइम आढळतं, जे पचनशक्ती चांगली करण्यास फायदेशीर ठरतं. जर तुम्हाला अॅसिडिटी किंवा बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास तमालपत्राचा चहा मदतशीर ठरेल.

(सूचना: ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Health Tips