• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • सेलिब्रिटींसारखा उजळ आणि तजेलदार चेहरा हवाय? मग हा घरगुती उपाय आहे तुमच्या कामाचा

सेलिब्रिटींसारखा उजळ आणि तजेलदार चेहरा हवाय? मग हा घरगुती उपाय आहे तुमच्या कामाचा

त्वचेवरील डागांसारख्या सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी, लोक वेगवेगळ्या प्रकारच्या महागड्या सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात. तर यासाठी अनेक लोक विविध प्रकारच्या सौंदर्य उपचारांची मदतही घेतात. पण,

 • Share this:
  मुंबई, 11 ऑक्टोबर : त्वचेला चमकदार बनवण्यासाठी आणि  हे काम कमी खर्चात घरी सहज करता येऊ (Bay leaf and curd face pack for glowing skin) शकते. त्यामुळे यासाठी बाहेर जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. तमालपत्र आणि दह्यापासून बनवलेल्या अशाच एका फेस पॅकबद्दल आज आपण माहिती घेऊया. त्यामुळे तुमच्या त्वचेवर सेलिब्रिटीसारखी चमक आणि उजळपणा येऊ शकतो. हा फेस पॅक कसा बनवता ते खालील कृतीतून समजून घ्या. फेस पॅक बनवण्यासाठी साहित्य तमालपत्र पावडर - 1/2 टीस्पून दही - 2 टेस्पून हळद - 1 चिमूटभर मध - 1/2 टीस्पून फेस पॅक कसा बनवायचा तमालपत्र आणि दह्याचे फेस पॅक बनवण्यासाठी आधी तमालपत्र मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पावडर बनवा. यानंतर दही एका भांड्यात काढून घ्या आणि चांगले फेटून घ्या. नंतर त्यात तमालपत्राची पूड मिसळा आणि पुन्हा एकदा चमच्याने चांगले फेटून घ्या. आता या मिश्रणात हळद आणि मध घालून या सर्व गोष्टी नीट मिक्स करा. आता तेजपत्ता आणि दही फेस पॅक तयार आहे. हे वाचा - प्यार का पंचनामा! 42 वर्षीय व्यक्ती विशीतील तरुणीच्या पडला प्रेमात, गावकऱ्यांनी अशी केली अवस्था असा वापरा हा फेस पॅक वापरण्यापूर्वी, आपला चेहरा सौम्य फेस वॉशने धुवा आणि वाळवा. नंतर हा पॅक चेहऱ्यावर आणि मानेवर चांगला लावून घ्या. ते कोरडे होईपर्यंत चेहऱ्यावर राहु द्या आणि नंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. हा फेस पॅक आठवड्यातून दोनदा वापरता येतो. हे वाचा - आधुनिक महिलांना नको असतं मूल, पाश्चिमात्यांचा प्रभाव चिंताजनक; मंत्रीमहोदयांची मुक्ताफळं हे फायदे तुम्हाला मिळतील तमालपत्र आणि दही फेस पॅक लावल्याने तुमच्या त्वचेत बरीच सुधारणा दिसेल. यासह, मुरुम, पुरळ, सनबर्न आणि टॅनिंग सारखे डाग देखील त्वचेवरून कमी होतील. या पॅकचा वापर त्वचेला मॉइश्चराइझ देखील करतो, ज्यामुळे कोरडेपणाही दूर होतो. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
  Published by:News18 Desk
  First published: