कर्करोगाच्या या लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, नाहीतर...

कर्करोगाच्या या लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, नाहीतर...

हा रोग पूर्णपणे बरो होत नाही हेही एक कटू सत्य आहे. कर्करोगाची अनेक लक्षणं असतात. काही कळणारे असतात तर काही अतीसुक्ष्म असतात.

  • Share this:

कर्करोग म्हटलं की आजही अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकतो. पण आता ही काही फाशीची शिक्षा राहिलेली नाही. आपण फक्त जागरुक राहणं गरजेचं आहे. कर्करोग हा एक असा आजार आहे ज्यामध्ये 'कपटीपणा' आहे. वैद्यकीय भाषेत कपटी म्हणजे हळहूळ सुरू होणारा रोग. रुग्णाला हा रोग झालाय हे माहीत नसल्यामुळे तो विश्वासघातकीही आहे.

आतापर्यंत अनेक कर्करोगाचे रुग्ण बरे झाले आहेत. हा रोग पूर्णपणे बरो होत नाही हेही एक कटू सत्य आहे. कर्करोगाची अनेक लक्षणं असतात. काही कळणारे असतात तर काही अतीसुक्ष्म असतात. प्रत्येकाला या सूक्ष्म लक्षणांविषयी जागरुक केले तर आपण ऑन्कोलॉजिस्टकडून यावर उपचार सुरू करू शकतो आणि वेळीच प्रतिबंध करता येऊ शकतो.

दक्षता-

- आपल्या आंत्रात किंवा मूत्राशयावरील सवयींमध्ये बदल होणं, बद्धकोष्ठामधील अंतर कमी होणं, सैल होणं आणि रक्त पडणं.

- जखम जी बरी होत नाही.

- असामान्य रक्तस्त्राव किंवा स्त्राव.

- स्तन किंवा इतरत्र गुठळी किंवा गाठ तयार होणे.

- अपचन किंवा गिळताना त्रास होणे.

- चामखीळ किंवा तीळमध्ये बदल होणं.

- खोकताना वेगळा आवाज येणे.

स्त्रियांना त्यांच्या स्तनांमध्ये झालेल्या बदलांची जाणीव असणे आवश्यक आहे. तपासणीद्वारे स्वत:च्या स्तनांमधील गुठळी किंवा त्वचेतील बदल लक्षात येऊ शकतो. यामुळे पुढील चाचणीमध्ये याचा उपयोग होऊ शकतो. ५५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या स्त्रियांना एक ते दोन वर्षांत स्तनांची मॉमोग्राफी करणं आवश्यक आहे. स्तन कर्करोगाची कौटुंबिक पार्श्वभूमी असणाऱ्या स्त्रियांना वयाच्या ५५ वर्षांपूर्वी स्क्रिनिंगची आवश्यकता आहे.

- २१ वर्षाच्या वयोगटातील सर्व स्त्रियांनी गर्भाशयाच्या ग्रीवाच्या कर्करोगाची चाचणी करुन घेणं आवश्यक आहे.

- २१ ते २९ या वयोगटातील महिलांनी दर ३ वर्षांनी पॅप चाचणी घ्यावी.

- ३० ते ६५ वयोगटातील महिलांनी दर पाच वर्षांनी एक पॅप चाचणी आणि एक एचपीव्ही चाचणी करणे आवश्यक आहे.

- ज्या स्त्रियांना गर्भाशय आणि गर्भाशयातील हिस्टेरेक्टोमी काढले आहे आणि त्यांना ग्रीव्हिक कर्करोग किंवा पूर्व कॅन्सरची कोणतीही पार्श्वभूमी नाही अशांनी स्क्रीनिंग केली नाही तरी चालते.

- कोणतंही व्यसन आणि उच्च चरबीयुक्त आहारचे सेवन न करणारी किंवा आरोग्यपूर्ण जीवनशैली असणारी व्यक्ती कर्करोगाला प्रतिबंध करण्यावर उत्तम प्रभाव टाकते.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

मोबाइल पाहता- पाहता रेल्वे रुळांवर पडली महिला, समोर आली ट्रेन, पाहा Viral Video

VIDEO: जेव्हा कावळ्याने केला चिमणीच्या बाळावर हल्ला, तेव्हा झालं असं काही...

नदीत तरंगणार हॉटेल होतंय तयार, 2020 च्या बुकिंगलाही झाली सुरुवात

फेवरेट पदार्थ खाऊनही आता वाढणार नाही तुमचं वजन, ही आहेत कारण

वडिलांचं नाव 'मध्यप्रदेश', मुलाचं नाव 'भोपाळ'.. अनोखी आहे नाव ठेवण्याची ही पद्धत

First published: November 3, 2019, 9:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading