डिजिटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा बँकेकडून पैसे !

तुमच्यासोबत डिजिटल फ्रॉड झाला असेल तर तुमचं नुकसान होणार नाही. बँकांनी तशी ताकद ग्राहकांना दिलीय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 14, 2017 04:31 PM IST

डिजिटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा बँकेकडून पैसे !

14जुलै : गेल्या काही वर्षात ऑनलाईन बँकिंगचं प्रमाण वाढलंय. त्यात नोटाबंदीनंतर डिजिटल ट्रान्झॅक्शन्समध्येही वाढ झालीय. वाढत्या इंटरनेट बँकिंगसोबत डिजिटल फ्रॉडही वाढलेत.आता मात्र डिजिटल फ्रॉडपासून बँकच ग्राहकांचं संरक्षण करणार आहे. आता तुमच्यासोबत डिजिटल फ्रॉड झाला असेल तर तुमचं नुकसान होणार नाही. बँकांनी तशी ताकद ग्राहकांना दिलीय. त्यासाठी खालील गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्या.

1.जर तुमच्यासोबत डिजिटल फ्रॉड झाला असेल तर त्याची माहिती तीन दिवसात तुम्ही बँकेला द्या.

2.असं केल्यावर बँक फ्रॉडमध्ये तुमचे गेलेले सगळे पैसे परत करेल. जर 4 ते 7 दिवसात माहिती दिली तर बँक फक्त 25000 रुपयेच परत करेल. जर सात दिवसांनंतर माहिती दिली तर मात्र किती पैसे परत करायचे हे बँक ठरवेल.

3.सायबर फ्रॉडपासून वाचण्यासाठी ऑनलाईन पैसे भरताना वेबसाईटवर पीसीसीआय-डीएसएस सर्टिफीकेट पाहावा.

Loading...

4.मोबाईलवरून पैसे भरताना पॅसेकचा लोगो पहावा. त्या लोगोवर जाऊन वैधतेचे सर्टिफिकेट चेक करावं. अज्ञात ईमेल आयडीवरून आलेल्या मेलमधील लिंक्स उघडू नका.

5.सिस्टिम, मोबाइलमध्ये, अँटी व्हायरस, स्पॅम फिल्टर, अँटी स्पायवेयर इन्स्टॉल करावे. तसंच अकाउंट बॅलंसही दररोज चेक करावा.

6.आपला लॉग-इन आयडी ,पासवर्ड कुणाशीही शेअर करू नका. शक्यतो तो क्लिष्ट बनवा. कुठल्याही पब्लिक वायफायवर मोबाईल बँकिंगचे अॅप उघडू नका.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 14, 2017 01:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...