आता बँकेचं कर्ज बुडवल्याने होऊ शकतो पासपोर्ट जप्त

आता बँकेचं कर्ज बुडवल्याने होऊ शकतो पासपोर्ट जप्त

कर्ज बुडवून परदेशात पळून जाण्याचा प्रयत्न केला तर विमानतळावर त्यांना थांबवण्यात येऊ शकतं

  • Share this:

नवी दिल्ली, ०६ सप्टेंबर-  तुम्ही जर बँकेकडून घेतलेलं कर्ज फेडू शकला नाहीत आणि तुमच्यावर गुन्हा दाखल झाला तर तुमचा पासपोर्ट जप्त होऊ शकतो. त्यामुळे बँकेकडून घेतलेलं कर्ज बुडवून जर तुम्ही देशाच्या बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर ते आता शक्य होणार नाही. सीएनबीसी आवाजला मिळालेल्या माहितीनुसार सरकार या महिन्यापासूनच हा नियम अंमलात आणू शकते. अनेकदा कर्जदार बँकेकडून कर्ज घेतात आणि ते न फेडता परदेशात पळून जातात. अशा लोकांवर आळा बसवण्यासाठी आता सरकारने हे पाऊल उचललं आहे.

पासपोर्ट कायद्यानुसार सेक्शन १० (३) (सी) मध्ये बदल होणार आहे. या महिन्याच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये याचिकेसाठी मंजुरी मिळू शकते. नवीन नियमानुसार ज्या लोकांनी ५० कोटींपेक्षा अधिक कर्ज घेतले आहे आणि कर्जदाराने ते फेडले नाही तर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा पासपोर्ट जप्त केला जाईल.

त्याचबरोबर कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेल्या किंगफिशर एयरलाइन्सचा मालक विजय माल्या आणि माजी आईपीएल कमिश्नर ललित मोदी यांना सरकारकडून देशात परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. असं म्हटलं जातंय की, पासपोर्टची कॉपी मागितल्यावर प्रवर्तकांवर अधिक दबाव वाढेल. तसेच कर्ज बुडवून परदेशात पळून जाण्याचा प्रयत्न केला तर विमानतळावर त्यांना थांबवण्यात येऊ शकतं.

युएस ओपनला खुलली प्रियांका-निकची केमिस्ट्री

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 6, 2018 11:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...