मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Bali Tour Plan : इंटरनॅशनल टूर, तेही स्वस्तात.. हे खरंच होऊ शकतं! बजेटमध्ये असा करा बालीचा टूर प्लॅन

Bali Tour Plan : इंटरनॅशनल टूर, तेही स्वस्तात.. हे खरंच होऊ शकतं! बजेटमध्ये असा करा बालीचा टूर प्लॅन

इंडोनेशियामध्ये असलेल्या बाली या बेटावर जाण्याची प्रत्येकाची इच्छा असते, जे आपल्या सुंदर आणि आकर्षक समुद्रकिनाऱ्यांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे हे ठिकाण फार महाग नाही.

इंडोनेशियामध्ये असलेल्या बाली या बेटावर जाण्याची प्रत्येकाची इच्छा असते, जे आपल्या सुंदर आणि आकर्षक समुद्रकिनाऱ्यांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे हे ठिकाण फार महाग नाही.

इंडोनेशियामध्ये असलेल्या बाली या बेटावर जाण्याची प्रत्येकाची इच्छा असते, जे आपल्या सुंदर आणि आकर्षक समुद्रकिनाऱ्यांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे हे ठिकाण फार महाग नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 6 जानेवारी : बऱ्याच लोकांना फिरण्याची भारी हौस असते. त्या नादात ते अख्खा भारत पिंजून काढतात. काही लोक कमी फिरतात. पण जे लोक त्यापैकी जवळजवळ सर्वनाच एकदातरी भारताबाहेर म्हणजेच इंटरनॅशनल टूर करण्याची इच्छ असते. मात्र सर्वांचं हे शक्य होत असं नाही. कारण भारताबाहेर जायचं म्हणजे खूप मोठा खर्च. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं की तुम्ही इंटरनॅशनल टूर अगदी तुमच्या बजेटमध्ये करू शकता. तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण खरंच, असे एक ठिकाण आहे जिथे तुम्ही फिरायला जाऊ शकता आणि भरपूर मज्जा करू शकता तेही कमी पैशात.

कमी बजेटमध्ये तुम्ही इंडोनेशियाची टूर आणि बाली सारख्या प्रसिद्ध बेटावर सुट्टी घालवण्याचा प्लॅन करू शकता. या टूरची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समुद्रकिनाऱ्यावर वसलेली बालीमधील अनेक ऐतिहासिक मंदिरे, पारंपारिक संगीतासह नृत्य जगभरातील लोकांना आकर्षित करण्यासाठी पुरेसे आहे. दरवर्षी जगभरातून मोठ्या संख्येने पर्यटक बालीमध्ये येतात. जर तुम्हीही बालीमध्ये सुट्टी घालवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अशा प्रकारे सहलीची योजना आखू शकता.

Street Food खाऊनही बिघडणार नाही तुमचं आरोग्य; फक्त या 3 बेसिक गोष्टी फॉलो करा

सर्वात आधी चलन बदला

जेव्हाही तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करता तेव्हा सर्वप्रथम चलन म्हणजेच करन्सी बदलून घेणे आवश्यक असते. यासाठी कोणत्याही बँकेचे ट्रॅव्हल इंटरनॅशनल कार्ड वापरता येईल. इथे बालीनीज रुपयाऐवजी डॉलर घेऊन गेलात तर त्याचा जास्त फायदा होईल.

ट्रिप इतक्या दिवसांची असावी

बालीमध्ये चांगला वेळ घालवण्यासाठी किमान एका आठवड्याचे नियोजन केले पाहिजे. जर बजेट चांगले असेल आणि प्रवासासाठी वेळही असेल, तर जवळच्या देशांना भेट देऊन चांगला अनुभव घेऊन तुम्ही बालीला परत येऊ शकता.

खूप महाग रिसॉर्ट घेऊ नका

बालीमध्ये अशी अनेक हॉटेल्स आहेत जी तुम्हाला स्वस्तात मिळू शकतात. यामुळे महागड्या रिसॉर्ट्सच्या फंदात पडू नका. बालीमध्ये, अर्ध्याहून अधिक वेळ प्रवासात जातो आणि उर्वरित वेळ विश्रांतीसाठी. त्यामुळे सामान्य हॉटेल्स हाच योग्य पर्याय राहील.

खाण्याच्या जागेची काळजी घ्या

जर तुम्ही शाकाहारी असाल तर बालीमध्ये खाण्याची समस्या उद्भवू शकते. स्थानिक रेस्टॉरंटमध्ये जा आणि स्वयंपाकीशी बोला, जेणेकरून तो तुमच्या कोणत्याही पदार्थात मांसाहार टाकणार नाही. याशिवाय बालीच्या कुटा बीचजवळच्या रस्त्यावर भारतीय खाद्यपदार्थही तुम्हाला आरामात मिळतील.

सोशल मीडियाचा अतिरेक मानसिक आरोग्यासाठी 'स्लो पॉयझन', संशोधनात मोठा खुलासा

बालीमधील सर्वोत्तम ठिकाण कोणते आहे?

बालीमध्ये अनेक आकर्षणे आणि पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. जे उत्कृष्ट आहेत. जातिलुव राइस टेरेस, माउंट बतुर, तानाह लॉट टेंपल अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांचा सहलीच्या यादीत समावेश केला पाहिजे.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Travelling