बेकिंग सोडा आणि व्हिनेगर; पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी करणार मदत

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर; पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी करणार मदत

कोरोना लॉकडाऊनमध्ये जीवनशैली बदलली आहे, त्यामुळे वजन वाढणं, लठ्ठपणा आणि विशेषत: वर्क फ्रॉम होम करताना कित्येक तास बसून राहिल्याने पोटावरील चरबी वाढण्याची समस्या अनेकांना उद्भवत आहे.

  • Last Updated: Aug 6, 2020 07:50 PM IST
  • Share this:

लठ्ठपणा अनेक आजारांचे मूळ आहे. चरबीयुक्त आहार आणि अनियमित जीवनशैलीमुळे लठ्ठपणा बळावतो. जेव्हा लठ्ठपणा येतो तेव्हा सर्वात आधी पोटाची चरबी वाढते आणि त्यानंतर इतर भागावर चरबी वाढू लागते. वाढत्या लठ्ठपणामुळे सांधेदुखी, कंबर दुखणे, श्वास घ्यायला त्रास होणे, शरीर सुजणे, किडनी आणि हृदयासंबंधित आजार होऊ लागतात. अशा परिस्थितीत बेकिंग सोडा आणि व्हिनेगर यापासून बनलेले पेय फायदेशीर होऊ शकते. हे पेय पोटाची चरबी कमी करते.

बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचं पेय आणि त्याचे काय फायदे आहेत जाणून घेऊयात.

व्हिनेगर चरबी कमी करतं

myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, अॅपल व्हिनेगर चरबी कमी करण्यात मदत करते. या व्हिनेगरमध्ये असलेली द्रव्ये चयापचय चांगले आणि सक्षम करते. आजकाल अनेक लोक पोटाची चरबी कशी कमी करावी या चिंतेत असतात. तेव्हा सफरचंदाचे व्हिनेगर त्यात खूप मदत करते. यामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरी बर्न होतात आणि पोटाची चरबी कमी होते. वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्यापोटी दोन चमचा बेकिंग सोड्यामध्ये व्हिनेगर टाकून घ्यायला हवे.

मधुमेही रुग्णांना फायद्याचे

सफरचंदाचे व्हिनेगर मधुमेह नियंत्रणात ठेवायला मदत करते. ते रक्त शर्करेची पातळी कमी करण्यात महत्त्वाची भूमिका निभावते. त्यासाठी बेकिंग सोडा व्हिनेगरमध्ये मिसळून जेवणाच्या अर्धा तास आधी घ्यायला हवं. तसंच रात्री झोपतानाुद्धा घेणं फायद्याचं आहे.

चेहऱ्यावरील पुळ्या दूर होतात

myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, सफरचंदाचे व्हिनेगर चेहऱ्यावरील पुरळ दूर करण्यासाठी उपयोगी आहे. या पुळ्या जिवाणूमुळे होत असतात. व्हिनेगरमध्ये भरपूर प्रमाणात असलेले अॅसिड या जीवाणूंचा नाश करते. हे आपल्या त्वचेही पीएच पातळी नियंत्रणात ठेवते. त्यासाठी व्हिनेगर रात्री झोपताना पुरळांवर लावावं आणि रात्रभर तसंच ठेवावं. सकाळी थंड पाण्याने चेहरा धुवावा. यामुळे पुरळ लवकर नाहीसे होण्यास मदत होते.

त्वचेवरील तजेला वाढवण्यासाठी व्हिनेगर उपयोगी

सफरचंदाच्या व्हिनेगरने त्वचा उजळते. ते त्वचेला गोरं करत नाही पण त्यावरील डाग कमी करते. त्यासाठी व्हिनेगर आणि पाणी 1:3 या प्रमाणात घ्यावे आणि ते मिश्रण चेहऱ्याला लावावे.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करते

हृदय रोग्यांची संख्या वाढते आहे. त्याचे मुख्य कारण शरीरातील वाढते कोलेस्ट्रॉलचे प्रमाण हे आहे. सफरचंदाचे व्हिनेगर कोलेस्ट्रॉल आणि ट्राईग्लिसराइड यांची पातळी कमी करते. त्याने हृदयाच्या अनेक रोगांपासून दूर राहण्यास मदत होते. एक ग्लास साध्या पाण्यात एक ते दोन चमचे व्हिनेगर मिसळावे आणि ते पाणी प्यावे त्याने खूप फायदा होतो. सफरचंदाच्या व्हिनेगरमधे असे गुण आहेत ज्याने शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात आणि यकृत साफ होते. त्याने यकृताची कार्यक्षमता वाढते. तसेच ऑस्टियोपोरोसिस आणि ऑस्टियोआर्थराइटिस या सारखे आजार असतील तर सफरचंदाचे व्हिनेगर घेण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - पोट, यकृत, तोंड आणि पचनाशी संबंधित आजार

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: August 6, 2020, 7:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading