चाळीशीनंतर बदला तुमच्या 5 सवयी; नाहीतर हृदयरोगाला कारणीभूत ठरतील

चाळीशीनंतर बदला तुमच्या 5 सवयी; नाहीतर हृदयरोगाला कारणीभूत ठरतील

चाळीशी हा वयाचा असा टप्पा आहे ज्या टप्प्यावर आरोग्याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे.

  • Last Updated: Jul 31, 2020 10:26 PM IST
  • Share this:

वाढत्या वयाबरोबर शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल होत असतात. चाळीशी हा वयाचा असा टप्पा आहे की त्या टप्प्यावर आरोग्याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे. या वयात आल्यानंतर पहिल्यासारखीच जीवनशैली ठेवणं योग्य नाही, उलट अनेक सवयी बदलायला हव्यात. अनेकदा गतिहीन जीवनशैलीमुळे या वयात लोकांना हृदय रोगाचा त्रास सुरू होण्याची शक्यता असते.

myupchar.com चे एम्सशी संबंधित डॉ. नबी वली यांनी सांगितलं, हृदय रोगांमध्ये रक्तवाहिन्यांचे रोगधमन्यांचे रोग, हृदयाच्या स्पंदनासंबंधी आजार यांचा समावेश होतो. अनेक प्रकारच्या हृदय रोगांना आपण जीवनशैलीमध्ये बदल करून प्रतिबंध घालू शकतो. चाळीशीनंतर कुठल्या सवयींपासून आपण दूर राहायला हवं, जाणून घेऊया.

नाश्ता न करणे

दिवसाची सुरुवात नाश्ता न करता करून लोक मोठी चूक करतात. आपल्या दिवसाची सुरुवात चांगल्या नाश्त्याने करायला हवी त्याने आपण आजारांना दूर ठेवू शकतो. नाश्ता न करणं आणि कोरोनरी हृदयरोग यांच्यात महत्त्वाचा संबंध आहे, असं अनेक संशोधनात दिसून आलं आहे.

अजिबात व्यायाम न करणे

शारीरिक रूपाने निष्क्रिय राहण्याने हृदय रोग होण्याचा धोका जास्त असतो. जे लोक अजिबात व्यायाम करत नाहीत त्यांना हा धोका जास्त असतो. व्यायाम केल्याने रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, वजन आणि तणाव सर्वच नियंत्रणात राहते आणि हृदयाचा झटका येण्याची शक्यता कमी होते.

अति झोपणे

जशी कमी झोप हृदयासाठी वाईट तशीच अति झोपदेखील हृदय विकाराचे कारण होऊ शकते. अमेरिकन हार्ट एसोसिएशन जर्नलमध्ये प्रकाशित शोधनिबंधामध्ये खुलासा करण्यात आला की, आठ तासांपेक्षा जास्त झोपणाऱ्या लोकांना कार्डिओवेस्क्युलर डिसीजचा धोका असतो.

बैठे काम

9-10 तास सतत बसून काम करत असाल तर सावधान! हे हृदय विकाराचे कारण बनू शकते. कुठलीही शारीरिक हालचाल न करता सतत बसून राहण्याने हृदय विकाराची शक्यता वाढते. myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला म्हणाले, तुम्ही कितीही व्यायाम करत असलात तरी खूप वेळ बसल्याने हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. म्हणून सतत बसून काम करणाऱ्या लोकांनी अधूनमधून उठून चालायला हवे.

अधिक काळ एकटे राहणे

मैत्री फक्त आनंद वाटण्यासाठी नाही तर हृदयाच्या आरोग्यासाठीदेखील आवश्यक आहे. लोकांपासून दूर राहणे, एकटे राहणे हे हृदय रोगाला आमंत्रण आहे. जर्नल हार्ट प्रकाशित एका अभ्यासात ज्या लोकांचे सामाजिक नाते चांगले नव्हते त्यांच्यात 29 टक्के जास्त हृदय रोगाचा धोका दिसून आला.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - कोरोनरी आर्टरी डिझीज (हृदय धमनी रोग)

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: July 31, 2020, 10:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading