मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Bad Food For Thyroid : तुम्हाला थायरॉईडचा त्रास आहे? मग आजपासूनच या पदार्थांना म्हणा बाय-बाय

Bad Food For Thyroid : तुम्हाला थायरॉईडचा त्रास आहे? मग आजपासूनच या पदार्थांना म्हणा बाय-बाय

थायरॉईड हा आजार सामान्यतः आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. थायरॉईड असल्यास आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण अनियमित जीवनशैली आणि आहारामुळे ही समस्या अधिक वाढू शकते.

थायरॉईड हा आजार सामान्यतः आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. थायरॉईड असल्यास आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण अनियमित जीवनशैली आणि आहारामुळे ही समस्या अधिक वाढू शकते.

थायरॉईड हा आजार सामान्यतः आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. थायरॉईड असल्यास आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण अनियमित जीवनशैली आणि आहारामुळे ही समस्या अधिक वाढू शकते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 9 डिसेंबर : गेल्या काही वर्षांत थायरॉईडच्या समस्या खूप वाढल्या आहेत. अनियमित जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे थायरॉईडचा प्रसार होत आहे. हेल्थलाइनच्या बातमीनुसार, थायरॉईड ग्रंथीच्या कार्यासाठी पुरेसे आयोडीन आवश्यक आहे. जेव्हा शरीराला आयोडीन कमी प्रमाणात मिळते तेव्हा हायपोथायरॉईडीझमचा धोका वाढतो. थायरॉईडचे दोन प्रकार आहेत, हायपरथायरॉईड आणि हायपोथायरॉइड.

थायरॉईडमुळे रुग्णाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. शरीराचे वजन अचानक वाढणे किंवा कमी होणे, थकवा जाणवणे आणि केस गळणे हे थायरॉईडची समस्या दर्शवते. थायरॉईड हा आजार सामान्यतः आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. थायरॉईड असल्यास आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण अनियमित जीवनशैली आणि आहारामुळे ही समस्या अधिक वाढू शकते.

रात्रीच्या खोकल्यामुळे झोप उडालीय का? त्याची कारणे आणि उपाय समजून घ्या

थायरॉईडवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य औषधांसोबत सकस आहारावरही लक्ष केंद्रित करावे लागेल. अनेक पदार्थांमुळे थायरॉईडचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे जास्त कॅलरी आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी करणे फायदेशीर ठरू शकते. आहारातून काही गोष्टी काढून टाकणे देखील फायदेशीर ठरू शकते. जाणून घ्या कोणते पदार्थ थायरॉडसाठीसाठी कारणीभूत ठरू शकतात.

ग्लूटेन

थायरॉईडचा त्रास असलेल्यांनी ग्लूटेनचा वापर कमी प्रमाणात करावा. मात्र बार्ली, गहू, मैदा, ओट्स आणि संपूर्ण धान्यांमध्ये ग्लूटेन आढळते, जे अन्नातून पूर्णपणे काढून टाकणे शक्य नाही. जर तुम्हाला थायरॉईड असेल तर या गोष्टींचे सेवन कमी करता येते. ग्लूटेन हे हाय प्रोटीन आहे जे शरीरात लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाब वाढवू शकते.

फास्ट फूड

थायरॉईडसाठी फास्ट फूड हे सर्वात हानिकारक मानले जाते. फास्ट फूडमध्ये आयोडीनची कमतरता असते, ज्यामुळे थायरॉईड वाढू शकते. अमेरिकन थायरॉईड असोसिएशनच्या मते, रेस्टॉरंटमध्ये बनवल्या जाणार्‍या खाद्यपदार्थांमध्ये आयोडीन मीठ कमी प्रमाणात वापरले जाते. यामध्ये असलेले सॅकरिन थायरॉईडची समस्या वाढवू शकते.

प्रक्रिया केलेले अन्न

आहारात आयोडीनचा अधिक समावेश करण्यासाठी तुम्ही प्रक्रिया केलेले अन्न वापरण्याचा विचार करत असाल, तर पुन्हा एकदा विचार करा. प्रोसेस्ड फूडमध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते हे मान्य, पण त्यात आयोडीनचा वापर झाला असेलच असे नाही. जास्त मीठ असलेले अन्न खाल्ल्याने हृदयाच्या समस्या वाढू शकतात.

शरीरातील ऊर्जा कमी करतात ‘या’ 5 गोष्टी; लगेच रुटीनमध्ये करा बदल

थायरॉईडची समस्या सध्या सामान्य झाली आहे. योग्य आहार आणि व्यायामाने नियंत्रित करणे सोपे आहे, परंतु आहारातील कोणतीही गोष्ट काढून टाकण्यापूर्वी किंवा वाढवण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

First published:

Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle