मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Bad Food For Kidney : तुमच्या किडनीसाठी घातक ठरू शकतात या 5 गोष्टी; योग्य प्रमाणातच खाणं आहे फायदेशीर

Bad Food For Kidney : तुमच्या किडनीसाठी घातक ठरू शकतात या 5 गोष्टी; योग्य प्रमाणातच खाणं आहे फायदेशीर

Kidney

Kidney

आजकालच्या धावपळीच्या जीवनात, बहुतेक लोक त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकडं दुर्लक्ष करतात, ज्याचे गंभीर परिणाम भविष्यात दिसू लागतात. ज्यामुळे त्यांचे शरीर अनेक रोगांना बळी (Bad Food For Kidney) पडते.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर : आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींवर आपलं आरोग्य अवलंबून असतं. निरोगी जीवनशैलीसाठी आपल्याला योग्य आहार पद्धती माहीत असणं गरजेचं आहे. आजकालच्या धावपळीच्या जीवनात, बहुतेक लोक त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकडं दुर्लक्ष करतात, ज्याचे गंभीर परिणाम भविष्यात दिसू लागतात. ज्यामुळे त्यांचे शरीर अनेक रोगांना बळी (Bad Food For Kidney) पडते. म्हणूनच शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी राहण्यासाठी योग्य आहार घेणं गरजेचं आहे.

लोकांच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि सवयींमुळे किडनीवर (Kidney) वाईट परिणाम होत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दारूचे अतिसेवन यासाठी सर्वात जास्त कारणीभूत आहे

मूत्रपिंड (किडनी) काय करते? (शरीरातील मूत्रपिंडाचे कार्य)

किडनी शरीरातील नको असलेले घटक लघवीद्वारे बाहेर काढण्याचे काम करते. ज्यांच्या किडनीचा त्रास सुरुवातीच्या टप्प्यात आढळून येतो, त्यांनी आहारात बदल करणं आवश्यक आहे. परंतु, काही लोकांच्या समस्या शेवटच्या टप्प्यावर गेल्यानंतर त्यामुळे त्यांना डायलिसिस करावे लागते.

या 5 गोष्टी किडनी खराब करतात

1. अल्कोहोलचे सेवन मूत्रपिंडासाठी हानिकारक

आयुर्वेद डॉक्टर अबरार मुलतानी यांनी झी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, जास्त प्रमाणात मद्यपान केल्यानं किडनी खराब होऊ शकते. जास्त प्रमाणात मद्यपान केल्यानं किडनीच्या कार्यामध्ये समस्या निर्माण होतात, त्याचा तुमच्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो. अल्कोहोलचा तुमच्या किडनीवरच वाईट परिणाम होत नाही तर इतर अवयवांनाही हानी पोहोचू शकते.

2. लाल मांस किडनीसाठी हानिकारक

मुलतानी यांच्या मते, लाल मांस हे प्रथिनांचा एक चांगला स्रोत आहे, परंतु ते किडनीसाठी हानिकारक ठरू शकते. रेड मीटमध्ये भरपूर फॅट आढळतात, ते किडनीसाठी चांगले नाही. युरिक ऍसिडमुळे किडनी खराब होऊ शकते, लाल मांसाच्या अतिसेवनामुळे शरीरात युरिक ऍसिडचे प्रमाणही वाढते.

हे वाचा - Jandhan अकाउंट घरबसल्या करा Aadhaar शी लिंक, अन्यथा होईल 1.30 लाखांचे नुकसान

3. कॅफिनचे सेवन मूत्रपिंडासाठी हानिकारक आहे

कॉफी आणि चहामध्ये कॅफिन मोठ्या प्रमाणात आढळते. बहुतेक लोक सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी चहा किंवा कॉफी पितात, पण तुम्हाला माहीती आहे का की, ही सवय किडनीसाठी घातक ठरू शकते. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कॅफिनच्या अतिसेवनाने रक्तदाब वाढतो, जो किडनीसाठी धोकादायक ठरू शकतो.

4. दुग्धजन्य पदार्थ मूत्रपिंडासाठी हानिकारक

दुग्धजन्य पदार्थ देखील किडनीला हानी पोहोचवू शकतात. कारण त्यामध्ये कॅल्शियम आणि इतर पोषक घटक तसेच प्रथिने भरपूर असतात. हे तुमच्या आहारासाठी फायदेशीर आहेत, परंतु त्यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्यानं किडनी खराब होऊ शकते. जास्त कॅल्शियममुळे किडनी स्टोन होऊ शकतो.

हे वाचा - Paytm IPO: एका झटक्यात पेटीएमचे कर्मचारी मालामाल; 350 जणं होणार कोट्यधीश

5. एवोकॅडोचा जास्त वापर

एवोकॅडो हे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे, पण पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने ते किडनीच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरते. एक कप एवोकॅडोमध्ये 37 टक्के पोटॅशियम आढळते. किडनीच्या रुग्णांनी दररोज 2,000 मिलीग्राम सोडियम आणि पोटॅशियम आणि 2,000 मिलीग्राम फॉस्फरस आहारात घ्यावे.

First published:

Tags: Health Tips, Kidney sell