मुंबई, 17 जानेवारी : पालक पनीर नावानेच लोकांच्या तोंडाला पाणी सुटेल. हॉटेलमध्ये गेल्यावर किंवा घरीदेखील काहीतरी वेगळं आणि चविष्ट खायचं असल्यास आपली पहिली पसंती पालक पनीरलाच असते. व्हेजिटेरियन लोकांसाठी तर पालक पनीर लाईफ सेव्हर आहे म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. पालक पनीर ही अत्यंत स्वादिष्ट आणि हेल्दी रेसिपी आहे, असेच सर्वांना वाटते. कारण त्यात कॅल्शियम समृद्ध पनीर आणि लोहयुक्त पालक दोन्ही आहेत.
पण जर तुम्हाला कळले की पालक पनीर अजिबात हेल्दी नाही तर? पालक पनीर हेल्दी नाही हे म्हंटल्याबरोबर सर्वांच्या भुवया उंचावल्या असतील. the wellness corner ने पालक पाणी या रेसिपीबद्दल सविस्तर विश्लेषण दिले आहेत. त्याच्या आधारे आज आम्ही आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. त्यावरून तुम्हीच ठरवा की, पालक पनीर तुमच्यासाठी कितपत हेल्दी आहे किंवा हेल्दी आहे की नाही?
दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल वाढतं का? नेमकी माहिती जाणून घ्या
पालक पनीर शरीरासाठी चांगले आहे की नाही?
- पनीर हे दुधापासून बनवले जाते त्यामुळे ते प्रोटीन आणि कॅल्शियमचा समृद्ध स्रोत आहे. पालक या हिरव्या पालेभाजीमध्ये लोह, फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन ए, ई, के आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिडचा मोठ्या प्रमाणावर समृद्ध स्रोत आहे. जो त्वचेच्या कर्करोगासारख्या आजारांना प्रतिबंधित करतो.
- पनीरमध्ये असलेले कॅल्शियम पालकामध्ये लोहाचे शोषण मर्यादित करते. पालकामध्ये लोहाचे शोषण 5% पेक्षा कमी असते, त्यामुळे ते शरीराला फारच कमी लोह पुरवते.
- पालकमध्ये ऑक्सलेटची उच्च पातळी असते, जी शरीरात कॅल्शियमचे शोषण रोखते आणि खूप कमी लोह शोषण्यास कारणीभूत ठरते.
- उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांसाठी पालक पनीर हा निश्चितपणे चांगला पर्याय नाही. कारण पनीर प्रोटीनचा समृद्ध स्रोत आहे. परंतु हे उच्च कोलेस्टेरॉलची समस्यादेखील उत्पन्न करू शकते. पनीर आणि पालक एकत्र जरी केले तरी त्याचे पौष्टिक मूल्य नगण्य राहते.
- काही लोकांना पालक पनीर एकत्र घेतल्यामुळे एलर्जीदेखील होऊ शकते. यामुळे पोट फुगणे, गॅस, पोट खराब होणे सारख्या समस्या उद्भवू शकतात.
- जे लोक आध्यात्मिकरित्या योगाचे अनुसरण करतात त्यांच्यामते पालक पनीर खाणे चांगले नाही. कारण ते शरोराच्या पोषण मूल्यांमध्ये कोणतीही भर घालत नाही. यातील लोह कॅल्शियमला कमी करते ज्यामुळे याचे पौष्टिक मूल्य शून्यावर येते.
पालक आणि पनीर एकत्र खाण्याऐवजी जर वेगवेगळे घेतले तर त्याची पोषक मूल्य तुम्हाला पूर्णपणे मिळतात. पालक खूप जास्त शिजवून. पालकाचे पोषण मूल्य अबाधित ठेवण्यासाठी तो कच्चा, वाफवलेले किंवा अगदी प्रमाणात बोली करून खावा. याने पालकात लोह आपल्या शरीराला लाभते. तर एकटे पनीर ज्या लोकांना वजन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी उत्तम आहे. मग आता तुम्हीच ठराव की पालक पनीर तुमच्यासाठी हेल्दी आहे की नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle