Symptoms of Teething : जर तुमचे लहान बाळ (Small Baby) विनाकारण रडत असेल, सर्व काही तोंडात घेण्याचा प्रयत्न करत असेल किंवा विनाकारण अस्वस्थ असेल तर कदाचित तुमच्या बाळाला नवीन दात येत आहेत. वास्तविक, बाळांना नवीन दात येत असतात तेव्हा त्यांच्यासाठी ते खूप वेदनादायक असते. एवढेच नाही, दात येण्याच्या (Symptoms of Teething) प्रक्रियेत शरीरात काही बदल देखील होतात. परंतु, अनेकदा माहितीच्या अभावामुळे आई-वडील ते नेमकं का रडतंय हे समजत नाही आणि ते विनाकारण अस्वस्थ होऊ लागतात.
बाळाला दात कधी येतात?
वेमएमडीच्या माहितीनुसार, बाळाचे दात साधारणत वयाच्या 4 ते 7 महिन्यांच्या दरम्यान येतात. मात्र, काही मुलांना यापेक्षाही अधिक कालावधीनंतर दात येऊ लागतात. विलंब लागला तरी ते कसलेही चिंतेचे कारण नाही.
दात येण्याची लक्षणे
चिडचिड आणि वारंवार रडणे
वास्तविक, दात येत असताना मुलांच्या हिरड्यांना त्रास होतो. अशा परिस्थितीत ते चिडचिडे आणि अस्वस्थ राहतात. त्यांना झोपेचाही त्रास होतो. अशा परिस्थितीत त्यांला शांत करण्यासाठी त्याच्या आवडीच्या गोष्टी करा आणि त्यांना आवडत्या गोष्टी करू द्या. त्याचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करा.
2. लूज मोशन असणे
मुलांना दात येत असताना अतिसाराची समस्या खूप सामान्य आहे. ही समस्या 2 ते 3 दिवस राहू शकते. काही मुलांमध्ये ही समस्या दिसत नाही. पण काही मुलांमध्ये ही समस्या अधिक असते. जर बाळाला आठवडा लूज मोशन होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशावेळी बाळांना डाळ पाणी किंवा तांदळाचे पाणी इत्याही देऊ शकता.
हे वाचा - क्षुल्लक कारणावरून विवाहितेला भयंकर शिक्षा; सासरच्यांनी बेल्टने मारहाण करत दिले गरम चटके
3. प्रत्येक गोष्ट तोंडात घालणे
जर तुमचे बाळ काही सापडेल ते तोंडात घालण्याचा प्रयत्न करत असेल, तर हे दात येण्याचे लक्षण आहे. खरं तर, जेव्हा दात येऊ लागतात तेव्हा हिरड्या दुखतात. अशा वेळी बाळांना काहीतरी चघळण्यापासून आराम मिळतो. अशा परिस्थितीत बाळाच्या मुलाच्या सभोवताली कोणत्याही घाणेरड्या वस्तू राहणार नाहीत याची काळजी घ्या. मुलांच्या हिरड्यांना स्वच्छ बोटांनी मसाज करणे चांगले. प्रत्येक वेळी स्वच्छता केल्यानंतरच त्याला खेळणी द्या.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. हे उपाय लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांशी संपर्क साधा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Small baby