काय म्हणताय! स्त्रीबीज आणि स्पर्मशिवायच जन्माला येणार मूल?

काय म्हणताय! स्त्रीबीज आणि स्पर्मशिवायच जन्माला येणार मूल?

शरीरातल्या कोणत्याही पेशींमार्फत मूल जन्माला घालणं शक्य होणार आहे. शास्त्रज्ञांनी प्रयोग केलेत.

  • Share this:

मुंबई, 03 मे : बाळ जन्माला येणं, म्हणजे स्त्रीबीज म्हणजे एग्ज (eggs) आणि शुक्राणू म्हणजे स्पर्म (sperm) लागतात. मात्र तुम्हाला असं कोणी सांगितलं की एग्ज आणि स्पर्मशिवायच मूल जन्माला येऊ शकतं तर... आश्चर्य वाटेलच. मात्र शास्त्रज्ञांनी तसा यशस्वी प्रयोग केला आहे आणि भविष्यात हे शक्य होणार आहे.

सामान्यपणे एग्ज आणि स्पर्म फर्टिलाइज होतात, तेव्हा एक प्रकारच्या पेशींचा समूह तयार होतो, ज्याला गर्भ म्हणजे एम्ब्रियो (Embryo) असं म्हणतात आणि ते विकसित होऊनच बाळ जन्माला येतं. एग्ज आणि स्पर्म या विशेष अशा पेशी असतात, ज्या शरीरातील इतर पेशींपेक्षा वेगळ्या असतात. मात्र आता या विशेष पेशींशिवाय शरीरातील इतर पेशींमार्फतही बाळ जन्माला येणं शक्य होणार आहे.

हे वाचा - ऐकावं ते नवल! गर्भनिरोधक म्हणून वापरलं जात होतं टॉयलेट क्लीनर?

काही वर्षांपूर्वी जपानचे शास्त्रज्ञ यू शाओ आपल्या प्रयोगशाळेत पेशींवर काम करत होते. त्यावेळी त्यांना या पेशी एकाच ठिकाणी एकत्र झाल्याचं दिसलं आणि या पेशींनी एम्ब्रियोसारखं रूप घेतलं. त्यानंतर यू शाओ आणि त्यांच्या टीमने त्या दिशेनं काम सुरू केलं.

काही काळानं प्रजननसाठी स्त्रीबीजाची गरजच पडली नाही. मात्र पुरुष शुक्राणूंची गरज होती. जेव्हा उंदराच्या स्पर्मला एग्जसारख्या दिसणाऱ्या या पेशींच्या समूहात इंजेक्शनच्या मदतीने सोडण्यात आले तेव्हा काही दिवसांतच टेस्ट ट्युबमधील एम्ब्रियो एका जीवाचा आकार घेऊ लागला आणि काही दिवसांतच उंदराच्या पिल्लात त्याचं रूपांतर झालं.

हे वाचा - 'लॉकडाऊनमुळे आलेला स्ट्रेस दूर करण्यासाठी सेक्स करा पण...',आरोग्य विभागाचा सल्ला

2017 च्या सुरुवातील आणखी एका प्रयोगात अशाच पद्धतीने आर्टिफिशिअल स्पर्मही विकसित करण्यात आले. स्पर्म पेशींचा आकार एखाद्या तुटत्या ताऱ्याप्रमाणे असतो, पुढे एक डोक्यासारखा भाग आणि मागे शेपटी. ही शेपटीच या स्पर्मला वेगानं पुढे जाण्यास मदत तरते. त्यामुळे प्रयोगशाळेतही असेच स्पर्म तयार करण्यात आले.

आता शास्त्रज्ञ या दोन्ही प्रयोगांना एकत्र करण्यात जुटलेत. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर स्त्रीबीज आणि शुक्राणूशिवाय शरीरातील इतर कोणत्याही पेशींमार्फत मूल जन्माला येऊ शकतं. मात्र याला आणखी काही अवधी लागेल.

टेस्ट ट्युब बेबीच्या तंत्रज्ञानातूनच मिळाला मार्ग

जवळपास 40 वर्षांपूर्वी टेस्ट ट्युब बेबी तंत्रज्ञान आलं आणि याचा फायदा अनेकांना झाला. पुरुषांचे स्पर्म काढून स्टोर केले जातात आणि महिलांना हार्मोन्स देऊन फर्टिलायझेशनसाठी तयार केलं जातं. त्यानंतर इंजेक्शनच्या माध्यमातून पुरुष स्पर्म महिलांच्या गर्भाशयात सोडले जातात.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: May 3, 2020, 7:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading