Home /News /lifestyle /

आश्चर्य! 3 Penises सह जन्माला आलं बाळ; पाहून डॉक्टरही झाले हैराण

आश्चर्य! 3 Penises सह जन्माला आलं बाळ; पाहून डॉक्टरही झाले हैराण

एकाच बाळाला 3 प्रायव्हेट पार्ट (Baby born with 3 penises) असणं हे पहिलंच प्रकरण असावं, असं तज्ज्ञ म्हणालेत.

    बगदाद, 03 एप्रिल :  काही बाळ जन्माला आल्यानंतर त्यांच्यात जन्मापासूनच काही ना काही तरी उणीव किंवा व्यंग असतं. कुणाच्या हाताला जास्त बोटं असतात, कुणाला हातच नसतात, कुणाचे दोन्ही पाय माशाप्रमाणे जोडलेले असतात अशी काही दुर्मिळ प्रकरणं आहेत. पण सध्या एक असं प्रकरण समोर आलं आहे, ज्यामुळे संपूर्ण जगाने आश्चर्य व्यक्त केलं आहे. ते म्हणजे चक्क तीन पेनिससह (Penis) एक बाळ जन्माला आलं (Baby born with 3 penises) आहे. हे प्रकरण आहे इराकमधील. मोसुल शहरातील दुहोकमध्ये या बाळाच्या प्रायव्हेट पार्टला (Private Part) सूज येत होती. त्याच्या जन्मानच्या तीन महिन्यांनी त्याच्या पालकांनी त्याला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. तेव्हा त्यांना जे दिसलं ते पाहून तेसुद्धा हैराण झालं. या बाळाला तीन लिंग (Triple penises) होते. मुख्य लिंगाला जोडून आणखी दोन लिंग होते. त्यापैकी एक लिंग मुख्य लिंगाच्या शेजारी होतं ज्याची लांबी दोन सेमी होती तर दुसरं मुख्य लिंगाच्या खालच्या बाजूला होतं ज्याची लांबी एक सेमी होती. हे वाचा - सॅल्युट! आगीत हॉस्पिटल पेटलं तरी डॉक्टर करत राहिले रुग्णाची सर्जरी; पाहा VIDEO इंटरनॅशनल जर्नल ऑफ सर्जरीमध्ये या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या रिपोर्टबाबत लिहिणारे डॉ. शाकिर सलीम यांनी सांगितलं, तीन लिंग असलेले बाळ ज्याला ट्रिपहेलिया म्हटलं जातं. आमच्या माहितीनुसार तीन पेनिस असणं म्हणजे ट्रिपहेलियाचं हे पहिलंच प्रकरण आहे. आता बाळाला आनुवंशिकपणे तर अशी समस्या आली नाही ना यासाठी त्याच्या कौटुंबिक इतिहासही तपासण्यात आला. पण त्या कुटुंबात याआधी असं कुणीच नव्हतं. त्यामुळे बाळ जेव्हा गर्भात होतं, तेव्हाच काहीतरी समस्या झाली असावी आणि त्यामुळे कदाचित असं बाळ जन्मलं असाव, अशी शक्यताही या रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आली आहे. हे वाचा - कमालच झाली! 3 वर्षांनी सर्जरीच्या दुसऱ्याच दिवशी चालू लागल्या पुण्याच्या आजी या तिन्ही लिंगापैकी फक्त एकच लिंग काम करत होतं. म्हणजे इतर दोन लिंगांमध्ये मूत्रमार्ग किंवा युरिन ट्युब नव्हती. त्यामुळे त्यातून लघवी निघत नव्हती. तपासणी केल्यानंतर मग डॉक्टरांनी अतिरिक्त दोन लिंग शस्त्रक्रिया करून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी ऑपरेशन करून हे लिंग काढलं. एक वर्षे तरी या बाळाला काही समस्या झालेली नाही. डेली मेलच्या रिपोर्टनुसार भारतातसुद्धा 2015 साली असं प्रकरण दिसून आलं होतं. ज्यामध्ये एका बाळाला दोन लिंग होते.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, PRIVATE part, Small baby

    पुढील बातम्या