आसमंतात घुमला ट्यांह ट्यांह; आकाशात जन्माला आलं बाळ

आसमंतात घुमला ट्यांह ट्यांह; आकाशात जन्माला आलं बाळ

धरतीपासून दूर उंचावर एका बाळाचा जन्म (baby born) झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 ऑक्टोबर : एखाद्या रेल्वेमध्ये बाळाचा जन्म झाल्याच्या बऱ्याच घटना आपण ऐकल्यात. मात्र विमानांमध्ये बाळाचा जन्म (baby born in flight) झाल्याच्या घटना तशा क्वचितच ऐकायला मिळतात. नुकतंच भारतातही एका बाळाचा जन्म आकाशात झाला आहे. इंडिगो (IndiGo)  विमानामध्ये एका महिलेची प्रसूती झाली आहे.

विमानामध्ये बुधवारी एका महिलेनं गोंडस बाळाला जन्म दिला आहे, अशी माहिती इंडिगोने दिली आहे. 6E 122 विमानात मुलाचा जन्म झाला आहे.

दिल्लीहून बंगळुरूला (Delhi-Bengaluru flight) जाण्यासाठी हे विमान निघालं होतं. त्यावेळी महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या. विमानातच तिची डिलीव्हरी झाली प्रसूती कालावधीआधीच हे बाळ जन्माला आहे. विमान रात्री 7 वाजून 40 मिनिटांनी लँड झालं. आई आणि बाळ दोघंही सुखरूप आहेत. दोघांचीही प्रकृती उत्तम आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.  विमानात सुखरूप डिलीव्हरी करणाऱ्या टीमचंही सर्वांनी अभिनंदन केलं आहे.

हे वाचा - सपना चौधरीने जानेवारीमध्येच लपूनछपून उरकलं लग्न, ऑक्टोबरमध्ये दिली गोड बातमी

विमानात बाळाचा जन्म होण्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या वर्षीदेखील ऑक्टोबरमध्येच विमानात प्रसूतीकळा सुरू झाल्याने एका विमानाचं मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं. एतिहाद अबुधाबी - जकार्ता EY 474 विमानात महिलेची डिलीव्हरी झाली होती. त्यानंतर मुंबई एअरपोर्टवर विमान लँड करून आई आणि बाळाला मुंबईतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

हे वाचा - प्रसिद्ध अभिनेत्रीने कोरोना काळात उरकलं लग्न, शेअर केले 'Secret Wedding' चे फोटो

तर जून 2017 मध्येदेखील जेट एअरवेजच्या विमानात एका महिलेची प्रसूती झाली होती. हे विमान सौदी अरेबियातून कोच्चीला जात होतं. एका महिलेला प्रसूती वेदना झाल्या. त्यामुळे विमानाच्या कॅप्टनने ते विमान मुंबईच्या दिशेने वळवलं. विमान लँड होण्याआधीच तिची डिलीव्हरी झाली. यानंतर आई आणि बाळ दोघांना मुंबईतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Published by: Priya Lad
First published: October 7, 2020, 10:05 PM IST

ताज्या बातम्या