या पानांच्या पावडरने काही महिन्यांत गुडघेदुखी होईल दूर, एकदा करा हे घरगुती उपाय

या पानांच्या पावडरने काही महिन्यांत गुडघेदुखी होईल दूर, एकदा करा हे घरगुती उपाय

सध्याची लाइफस्टाइल, जास्तीत जास्त वेळ बसून काम करणं आणि खाण्याच्या सवयींमुळे ही समस्या कमी वयातील महिलांनाही जाणवू लागते.

  • Share this:

तुम्ही अनेकांना गुडघेदुखीच्या त्रासाने त्रस्त झालेलं पाहिलंच असेल. हे दुखणं थंडीच्या दिवसांमध्ये अजून वाढतं. डॉक्टरांच्या मते, तापमानातील सततच्या बदलांमुळे गुडघ्यांच्या बाजूच्या नसा सूजतात, ज्यामुळे दुखणं अजून वाढतं. जर तुम्हीही गुडघेदुखीमुळे त्रासलेले असाल तर पुढील उपायांनी तुमच्या दुखण्याला बराच आराम मिळेल.

एका ठरावीक वयानंतर लुब्रिकेशन आणि कॅल्यशियमच्या कमतरतेमुळे गुडघे दुखीचा आजार बळावतो. पण सध्याची लाइफस्टाइल, जास्तीत जास्त वेळ बसून काम करणं आणि खाण्याच्या सवयींमुळे ही समस्या कमी वयातील महिलांनाही जाणवू लागते.

बाभळीच्या झाडाचे किती फायदे आहेत हे तर साऱ्यांनाच माहीत आहेत. बाभळीच्या कोवळ्या फांद्यांचा (काड्यांचा) उपयोग दात घासण्यासाठी करतात. बाभळीच्या पानांचा फक्त दातांसाठीच नाही तर अनेक आजार बरे करण्यासाठी उपयोग केला जातो. बाभूळ हे कफ आणि पित्तनाशक आहे. बाभळीच्या कोवळ्या फांद्या फार गुणकारी असतात. यात अँटी- माइक्रोबिल आणि अँटी- ऑक्सीडन्ट गुण आहेत, ज्यामुळे शरीरातील कोणत्याही दुखण्याला आराम मिळतो.

दुखण्यावर बाभळीचा कसा वापर करायचा-

- बाभळीची पानं घेऊन त्या चांगल्याप्रकारे सुकवा.

- पानं सुकल्यानंतर त्याची पावडर तयार करा. त्यानंतर त्यात तेवढ्याच प्रमाणात मेथीच्या दाण्याची पावडर तयार करा.

- आता दोन्ही पदार्थ चांगल्या प्रकारे एकसंध करा.

- ही पावडर कोमट पाण्यातून सकाळ- संध्याकाळी एक चमचा खा. दोन- तीन महिने ही पावडर सलग घेतल्याने गुडघे दुखीपासून आराम मिळेल.

- या पावडरचे कोणतेही दुषअपरिणाम नाहीत पण बद्धकोष्ठतेवेळी ही पावडर न घेतलेली केव्हाही चांगली.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

तुम्हाला चादरीत डोकं घालून झोपायची सवय आहे का? वेळीच व्हा सावध, नाहीतर...

तुम्हाला सतत जांभया येतात का? तर या आजारांपासून रहा सावध!

CISF जवानाला हुंड्यात मिळाले 11 लाख रुपये, म्हणाला- 'मला पैसे नाही तर...'

शरीरातील या छोट्या बदलांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, नाहीतर...

सावधान! चहासोबत सिगारेट ओढणं आजच थांबवा, कारण...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 16, 2019 07:48 PM IST

ताज्या बातम्या