तुमची मुलंही बोलताना अडखळतात का? घरच्या घरी करा असा उपचार

तुमची मुलंही बोलताना अडखळतात का? घरच्या घरी करा असा उपचार

एका औषधी वनस्पतीने तुम्ही तुमच्या मुलांची ही समस्या दूर करू शकता.

  • Last Updated: Sep 22, 2020 01:48 PM IST
  • Share this:

आकरकरा औषधाबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. आयुर्वेदात आकरकरा औषधाचे खूप आश्चर्यकारक लाभ आहेत. याचं चूर्ण सामान्यपणे औषध म्हणून घेतलं जातं. आकरकराच्या सेवनाने बोलताना अडखळण्याची समस्या दूर होते. हे औषध अशा अनेक शारीरिक समस्यांपासून मुक्त करू शकते, ज्यामुळे लोक अस्वस्थ आहेत. जरी आकरकराची चव कडू असली तरी ते अनेक गुणांनी समृद्ध आहे. चला त्याचे फायदे जाणून घेऊ -

कोरड्या खोकल्यापासून मुक्तता

myupchar.com शी संबंधित डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ल यांनी सांगितलं, हवामान बदलल्यामुळे कोरड्या खोकला होतो आणि त्याने बराच त्रास होतो. यासाठी आकरकरा ही अत्यंत फायदेशीर औषधी वनस्पती आहे. 2 ग्रॅम आकरकरा आणि 1 ग्रॅम सुंठ मिसळून काढा तयार करावा आणि दिवसातून दोन ते दहा मिलीग्राम सकाळ संध्याकाळ सेवन करा, याने खोकला बरा होतो.

पाठदुखीचा त्रास दूर होतो

कार्यालयात एकाच स्थितीत बसल्यामुळे बहुतांश लोक पाठीच्या दुखण्याने ग्रस्त असतात. यासाठी आकरकरा रोपाच्या मुळांची पावडर अक्रोडच्या तेलात मिसळा आणि कंबरेच्या भागात नियमितपणे मालिश करा. यामुळे पाठदुखीची समस्या दूर होईल किंवा ज्यांना कटिप्रदेश वेदनांची समस्या आहे, ते यातून मुक्त होतील.

आकरकरामुळे दातदुखी आणि तोंडाची दुर्गंधी दूर होते

myupchar.com शी संबंधित डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ल यांच्या मते, आकरकराची मुळे चघळणं किंवा त्याच्या मुळांचं एक मिश्रण तयार करून त्याने गुळण्या केल्यास देखील दातदुखी बरी होते. या बरोबरच आकरकरा, माजुफल, नागरमोथा, काळी मिरी, भाजलेली फिटकरी आणि खडक मीठ इत्यादी सर्व गोष्टी एकत्र करून बारीक पूड बनवा आणि नंतर या चूर्णाने दररोज ब्रश करा. यामुळे तोंडाचा दुर्गंध दूर होतो. तसंच दात आणि हिरड्या मजबूत होतात.

संधिवातात फायदेशीर

चुकीच्या नित्यकर्मांमुळे बर्‍याच लोकांना आर्थरायटिसच्या समस्येचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत आकरकरा औषधी वनस्पती खूप प्रभावी आहे. सांधेदुखीचा त्रास बरा होण्यासाठी आकरकराची पेस्ट सांध्यावर लावा आणि नंतर शेका. यामुळे संधिवाताची वेदना कमी होईल.

बोलताना अडखळण्याची समस्या दूर होईल

बऱ्याच मुलांना ती मोठी झाल्यावरही बोलताना अडखळण्याची सवय असते, या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आकरकरा, काळी मिरी आणि हिरड्याच्या सालाची बारीक पूड करून घ्या. नंतर हे मिश्रण 1 ते 2 ग्रॅम दिवसातून दोन किंवा तीन वेळा मुलांना मध घालून द्या. यामुळे त्यांच्या टॉन्सिलची समस्या देखील दूर होईल. याव्यतिरिक्त दररोज मुलांच्या जिभेवर हे मिश्रण काही प्रमाणात चोळा. हे त्यांची बोबडे किंवा अडखळून बोलण्याची समस्या सोडवेल.

अर्धांगवायूसाठी फायदेशीर

अर्धांगवायूच्या उपचारातही आकरकरा हे एक महत्त्वाचे औषध आहे. आकरकराचे मूळ बारीक वाटून तिळाच्या तेलात मिसळून आणि नियमित मालिश केल्यास अर्धांगवायूच्या रूग्णाला फायदा होईल. आकरकराच्या मुळाची पूड सकाळी व संध्याकाळी 1 ग्रॅम मधा बरोबर चाटल्यास अर्धांगवायूमध्ये फायदेशीर ठरते.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - निरोगी राहण्याचे उपाय

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: September 22, 2020, 1:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading