वजन कमी करायचंय; घरच्या घरी करता येतील असे 5 आयुर्वेदिक उपचार

वजन कमी करायचंय; घरच्या घरी करता येतील असे 5 आयुर्वेदिक उपचार

वजन कमी (weight loss) करण्यासाठी कोणतं दुसरं औषध घेण्याची गरज नाही, तुमच्या घरातील हे पदार्थच पुरेसे आहेत.

  • Last Updated: Oct 15, 2020 11:26 PM IST
  • Share this:

आयुर्वेदाच्या दृष्टीने वजन वाढणं ही एक चक्रीय प्रक्रिया आहे. जीवनशैली आणि आहाराशी संबंधित चुकीच्या सवयी वाढू लागतात ज्यामुळे पाचन उष्मा कमकुवत होत जातो. विषारी द्रव्य शरीरात वाढू लागतात. चरबी आणि चयापचय याने ऊतींमध्ये समस्या उद्भवतात. जेव्हा यंत्रणांच्या कामकाजात असमतोल असतो तेव्हा ऊतींमध्ये काही बदल होतात ज्यामुळे आपोआपच वजन वाढू लागते. श्लेष्मा, वात ऊर्जा आणि मेदयुक्त धातू (चरबी) मध्ये असमतोल असतो.

myupchar.com चे डॉ लक्ष्मीदत्त शुक्ल यांनी सांगितलं, आयुर्वेदात विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी, खाण्याच्या सवयी सुधारण्यासाठी, पाचन तंत्राला बळकटी देण्यासाठी, चयापचय सुधारण्यासाठी आणि तणावाची पातळी कमी करण्यासाठी विविध औषधी वनस्पती आणि औषधं फायदेशीर आहेत. या औषधी वनस्पतींच्या वापरामुळे वजन कमी होतं, तसंच पोटातील अस्वस्थता दूर होते.

दालचिनी

अँटीऑक्सिडंट आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असलेली दालचिनी शतकानुशतके औषधी वनस्पती म्हणून वापरली जात आहे. दालचिनीचा वापर वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकतो. यामुळे चयापचय सुधारण्यास मदत होते. चव आणि सुगंध वाढवण्यासाठी वापरण्यात येणारा हा भारतीय मसाला भूकदेखील कमी करण्यास मदत करतो. हे कोलेस्टेरॉल कमी आणि चयापचय दर वाढवण्यासाठी ओळखलं जातं. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात आणि पोट फुलण्याची समस्या दूर होते. उकळत्या पाण्यात दालचिनी पावडर घाला आणि दोन ते तीन मिनिटं किंवा त्याहून जास्त वेळेसाठी पाणी उकळू द्या. हे मिश्रण गाळून प्या. लक्षात ठेवा की वजन कमी करण्यासाठी फक्त सिलोन दालचिनीचा वापर केला जातो.

काळी मिरी

पिप्रिनने समृद्ध काळी मिरी वजन कमी करण्यास मदत करते. पिप्रिन घटक चरबीच्या पेशी तयार होण्यास प्रतिबंधित करतं. एक कप गरम पाण्यात एक चतुर्थांश मिरपूड आणि एक चमचा मध टाकून प्या. यामुळे चरबी पेशी पसरणार नाहीत आणि पोट चांगलं राहिल. विषारी घटक शरीराबाहेर फेकले जातील. हे पाणी रोज प्यायल्याने शरीराचा बांधा सुंदर बनतो.

कडूनिंब

वजन कमी करण्यासाठी औषधी गुणधर्म असलेल्या कडूनिंबाचा वापरदेखील केला जाऊ शकतो. कडूलिंबाची पानं पाण्यात टाकून हे पाणी प्या. कडूनिंब शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतं आणि रक्त परिसंचरण सुधारतं. हे चयापचय प्रक्रिया वाढवून वजन कमी करण्यास मदत करतं.

ग्रीन टी

myupchar.com शी संबंधित एम्सचे डॉ. अनुराग शाही यांनी सांगितलं, प्रत्येक व्यक्तीची चयापचय प्रणाली वेगळ्या पद्धतीने कार्य करतं. काहींमध्ये वेगवान कार्यप्रणाली असते जी चरबी गोठवू शकत नाही तर काही कमी वेगाने काम करतात ज्यामुळे वजन वाढतं. अँटीऑक्सिडंटयुक्त ग्रीन टी चयापचय वाढवते आणि चरबी वितळण्यास मदत करते. एक वाटी पाणी गरम करून त्यात दालचिनीची पूड घाला आणि दोन मिनिटं उकळी येऊ द्या. त्यानंतर त्यात ग्रीन टीची पानं घाला आणि नंतर मिश्रण गाळून घ्या आणि प्या.

पिवळ्या रंगाची फुलं येणारं रानटी फुलझाड (डँडेलियन)

एक कप पाण्यात एक चमचे पिवळ्या फुलांचं फूलझाड (डँडेलियन) उकळवा. ते उकळल्यानंतर मिश्रण गाळून घ्या आणि थंड करा आणि प्या. तंतुमय पदार्थांनी समृद्ध डँडेलियन चरबीचे रेणू शोषण्यापासून प्रतिबंधित करतं. इतकंच नाही तर हे हानिकारक प्राणवायूचे कण साफ करण्यास आणि विषाक्त पदार्थ काढून टाकण्यास मदत करतं.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - उत्तम आरोग्यासाठी सकस आहार

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: October 15, 2020, 11:26 PM IST

ताज्या बातम्या