खूप महत्त्वाचे आहेत गर्भसंस्कार; नेमकं काय आणि कसं करावं समजून घ्या

खूप महत्त्वाचे आहेत गर्भसंस्कार; नेमकं काय आणि कसं करावं समजून घ्या

बाहेरील वातावरणाचा गर्भातील बाळावर होणारा परिणाम यावरच गर्भसंस्काराची (garbh sanskar) संकल्पना आधारित आहे.

  • Last Updated: Sep 18, 2020 04:49 PM IST
  • Share this:

प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत उल्लेख केलेल्या सोळा संस्कारांपैकी एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे गर्भसंस्कार. आयुर्वेदानुसार निरोगी बाळाला जन्म देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे गर्भसंस्कार. हा संस्कार आयुर्वेदाचा महत्त्वपूर्ण भाग असून वैद्यकीय शास्त्र म्हणूनही त्याचा स्वीकार करण्यात आला आहे. गर्भसंस्कारानुसार आई आणि गर्भाशयात वाढणारं बाळ प्रत्येक क्षणी एकमेकांशी जोडलेले असतात.आईची भावनिक अवस्था, मानसिक स्थिती, तिची विचारसरणी, आहार इत्यादी सर्व गोष्टी गर्भावर परिणाम करतात. ते बाळ आईच्या गर्भात सर्वकाही ऐकतं. आईची सवय, तिच्या इच्छासुद्धा संस्काराच्या रूपात तिच्या बाळामध्ये प्रवेश करतात, ज्या नंतर वेळोवेळी दिसून येतात.

myupchar.com चे डॉ. विशाल मकवाना यांनी सांगतिलं, "गर्भसंस्कारानुसार बाहेरील वातावरणाचा बाळावर परिणाम होतो. यावरच गर्भसंस्काराची संकल्पना आधारित आहे. म्हणजेच एक सुदृढ आणि आनंदी मूल म्हणजे आनंददायी वातावरणाचा परिणाम असतो. गर्भसंस्काराचे आई आणि मूल दोघांना बरेच फायदे असतात."

सात्विक आहार घ्या

गर्भसंस्कारात सात्विक आहाराचा समावेश देखील महत्वाचा आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या पदार्थांच्या आधारे ताजा, सौम्य, शाकाहारी आणि पौष्टिक आहार याला सात्विक आहार म्हणतात. myupchar.com चे डॉ लक्ष्मीदत्त शुक्ल म्हणाले, शाकाहारी अन्नालाच नैसर्गिकदृष्टया सात्विक अन्न मानलं जातं. सात्विक हे शांतता, एकाग्रता, सर्वांसाठी प्रेम, मनात आशावाद यासारख्या गुणांसाठी ओळखलं जातं. सात्विक अन्न शरीर शुद्ध करतं आणि मनाला शांती देतं. सात्विक अन्नामध्ये गोड, आंबट, कडू, तिखट, खारट अशा सर्व चवींचा समावेश असतो. मात्र मसालेदार, डबाबंद, प्रक्रिया केलेले किंवा आंबवलेले खाद्य पदार्थ टाळले पाहिजेत.

सुखदायक संगीत ऐका

गर्भाशयात मूल तिसऱ्या महिन्याच्या सुरुवातीपासूनच ऐकण्यास आणि प्रतिसाद करण्यास सक्षम होतं. म्हणूनच गर्भवतीने सुखदायक आणि शांतिमय असं संगीत ऐकावं. गरोदरपणात तणाव कमी करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. विशेषतः खास वाद्यांसह वाजवलेल संगीत ऐकणं मुलाच्या मेंदूच्या विकासास आणि श्रवणाला उत्तेजन देतं.

सकारात्मक विचार

गर्भधारणेदरम्यान संप्रेरकात बदल होतात यात काही शंका नाही आणि यामुळे मूड बदलतो. पण आईने मनःस्थिती चांगली ठेवणं नवजात मुलाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. यासाठी सकारात्मक विचारसरणी महत्वाची भूमिका निभावते. आपले विचार योग्य दिशेने आणि सकारात्मक असायला हवेत. यासाठी अशा कार्यांवर लक्ष केंद्रीत करा जे आनंद देतात. छंद जोपासा, आवडीच्या गोष्टींसाठी वेळ द्या.

ध्यान आणि हलका व्यायाम

तणावाचा सामना करण्यासाठी यावेळी योगाचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक आहे. गर्भधारणेदरम्यान ध्यानसाधना आणि योगाभ्यास केल्याने बाळावर सकारात्मक परिणाम होईल. गर्भधारणेदरम्यान हलके व्यायाम करा कारण यामुळे स्नायूंना आराम मिळतो. पाठ किंवा पायांचं दुखणं कमी करण्यास मदत मिळते.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख – गर्भधारणा

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: September 18, 2020, 4:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading