कॅन्सरला दूर ठेवायचं आहे मग दररोज बिनधास्त खा पिझ्झा पण...

कॅन्सरला दूर ठेवायचं आहे मग दररोज बिनधास्त खा पिझ्झा पण...

काही पदार्थांचं सेवन करून कॅन्सरला (cancer) दूर ठेवता येऊ शकतं.

  • Last Updated: Oct 1, 2020 09:09 PM IST
  • Share this:

कॅन्सरसारख्या (cancer) आजारांच्या रुग्णांचं प्रमाण सध्या वाढतं आहे. केमिकलयुक्त पदार्थ, वस्तू आणि बदलत्या जीवनशैलीचा हा परिणाम आहे. कुणाला कोणता कॅन्सर होईल सांगू शकत नाही. पण कॅन्सरसाठी कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी टाळणं हेच आपल्या हिताचं आहे. कॅन्सरला दूर ठेवणं आपल्या हातात आहे. कॅन्सरपासून बचावासाठी काय करता येईल ते पाहुयात.

नियमितपणे सलाड खा

नियमित सलाड खाल्ल्याने शरीराला सर्व खनिजं आणि मिनरल्स मिळतात, ज्यामुळे कर्करोगाचा आजार रोखू शकतो. बहुतेक पालेभाज्यांचे सलाड शरीरासाठी फायदेशीर आहे. यामध्ये कॅल्शियम, लोह, केरोटीन, थायमिन, राइबोफ्लेविन, नियासिन आणि जीवनसत्त्व सी देखील आहे.

दररोज खा पिझ्झा

प्रत्येकाला पिझ्झा खायला आवडतोच. त्यात दररोज पिझ्झा खाण्यास सांगितलं तर यापेक्षा जास्त आनंद तो म्हणजे काय. होय, दररोज पिझ्झा खाल्ल्यास कर्करोग देखील दूर ठेवता येतो. यामध्ये सर्व भाज्या असतात ज्यातून सर्व खनिजे आणि जीवनसत्त्वे देखील शरीराला मिळतात. पण पिझ्झा बेसमध्ये मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर करावा.

लसूण

पोटाचा कर्करोग टाळण्यासाठी दररोज जेवणानंतर एक तास कच्च्या लसणाच्या दोन कळ्या चघळाव्यात. यामुळे कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहतं.

तुळस

तुळशीत अँटीबॅक्टिरिअल घटक असतात. याव्यतिरिक्त यात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे गुणधर्म देखील आहेत. तुळशीची 20 ते 25 पाने बारीक करून त्यात एक वाटी दही घालून सकाळी आणि संध्याकाळी याचं नियमित सेवन करावं.

डाळिंब आणि चिंच

डाळिंब आणि चिंचेचे नियमित सेवन केल्याने कर्करोगाने ग्रस्त व्यक्तीची प्रतिकारशक्ती वाढते. शिवाय कर्करोगात भाकरीपेक्षा भात अधिक खावा.

द्राक्षे

दररोज जेवणानंतर द्राक्षं खाल्ली तर यामुळे आतड्यांसंबंधी कर्करोग होण्याचा धोका कमी होतो, असं एका संशोधनात दिसून आलं आहे. आतड्यांमध्ये भरपूर तंतुमय पदार्थ गेल्यास पचन नीट होण्यास मदत होते.

मासे आणि अळशी

सागरी अन्नपदार्थांमध्ये ओमेगा -3, फॅटी अॅसिड्स असतात ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. यासह अळशीमध्ये देखील ओमेगा 3 घटक मुबलक प्रमाणात असतात. अळशीचं नियमित सेवन कर्करोगापासून बचाव करतं.

अश्वगंधा 

कर्करोगाच्या उपचारात दिल्या जाणाऱ्या औषधांमध्ये कर्करोगाच्या पेशी तसंच निरोगी पेशी यांना प्रभावित करणारे गुणधर्म असतात. तसंच  अश्वगंधाचं सेवन केल्यास सामान्य पेशी नष्ट होत नाहीत. हे एक नैसर्गिक औषध आहे, जे शरीराला कुठल्याही प्रकारे हानी पोहोचवल्याशिवाय कर्करोगास बरं करतं.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - कैंसर: लक्षणे, कारणे, उपचार, औषध...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: October 1, 2020, 9:09 PM IST

ताज्या बातम्या