ब्लड प्रेशर आणि डायबेटिज रुग्णांसाठी गुणकारी आहे अक्रोड; वाचा काय आहेत याचे फायदे

ब्लड प्रेशर आणि डायबेटिज रुग्णांसाठी गुणकारी आहे अक्रोड; वाचा काय आहेत याचे फायदे

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अक्रोड (walnut) खाण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. याशिवायही त्याचे बरेच फायदे आहेत.

  • Last Updated: Sep 20, 2020 02:28 PM IST
  • Share this:

सुकामेवा सहसा सर्व लोकांना आवडतोच. सुकामेवा खाण्यासाठी जितका चांगला आहे तितकाच तो आरोग्याच्या दृष्टीनेदेखील फायदेशीर आहे. सुक्यामेव्यातील एक म्हणजे अक्रोड. मेंदूसारखा दिसणारा हा सुकामेवा मेंदूसाठी खरोखरच फायदेशीर असतो. म्हणून स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अक्रोड खाण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. अक्रोड खाण्याचे आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया

हाडांसाठी फायदेशीर

अक्रोडमध्ये कॅल्शियम आणि जीवनसत्त्व डी असतं, ज्यामुळे हाडं मजबूत होतात. याशिवाय त्यात आढळणारा अल्फा लिनोलेनिक अॅसिड हा घटक हाडं मजबूत करण्यासदेखील मदत करतो. ज्यांना गुडघेदुखीच्या तीव्र वेदना आहेत त्यांनी नियमितपणे अक्रोड खावे.

अक्रोड वजन कमी करतं

myupchar.com शी संबंधित डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ल यांनी सांगितलं, अक्रोड वजन कमी करण्याससुद्धा उपयुक्त आहे. सकाळी रिकाम्या पोटी अक्रोडचं सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते

रक्तदाब संतुलन

दैनंदिन जीवनात प्रत्येक वयोगटातील लोकांना अनियमित दिनक्रम आणि चुकीच्या आहारामुळे रक्तदाब असंतुलनाची समस्या भेडसावत आहे. अक्रोड या समस्येमध्ये खूप फायदेशीर आहे. अक्रोड उच्च रक्तदाब समस्येवर मात करण्यास मदत करतं. अक्रोड हृदयाशी संबंधित धोका देखील कमी करण्यात उपयुक्त आहे.

स्मरणशक्ती मजबूत बनवते

अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड आढळतात. हे मेंदूला सहजतेने कार्य करण्यास मदत करतात. बर्‍याच संशोधनात असं आढळलं आहे की अक्रोड खाण्याने मेंदूच्या कार्य करण्याच्या क्षमतेत सुधार येतो. तसंच स्मरणशक्ती देखील सुधारते.

अक्रोडमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते

अक्रोड शरीरातील रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे. त्यामध्ये प्रथिनांचे इम्युनोमोडायलेटरी प्रभाव असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास उपयुक्त मानले जातात.

अक्रोड तणाव दूर करतं, शांत झोप लागण्यास मदत होते

myupchar.com शी संबंधित डॉ लक्ष्मीदत्त शुक्ल यांनी सांगितलं, अक्रोडमधील जीवनसत्त्व बी 6, ट्रायटोफन, प्रथिने आणि फॉलिक अॅसिड तणाव कमी करण्यास मदत करतात.त्यात आढळणारे ओमेगा 3 फॅटी अॅसिड मूड ठिक करण्यास मदत करतात आणि तणाव कमी झाला की शांत झोपही आपोआपच लागते.

मधुमेहातही फायदेशीर

अक्रोडची पानं मधुमेहासाठी आयुर्वेदिक उपचार म्हणून वापरली जातात. एका संशोधनात असं दिसून आलं आहे की, अक्रोडच्या पानांमध्ये अँटी-डायबेटिक गुणधर्म असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होण्यास मदत होते. मधुमेह असलेल्या रुग्णांनी दररोज अक्रोड खावं.

गर्भवती महिलांसाठी आरोग्यदायी औषध

अक्रोडमध्ये आढळणारे सर्व घटक गर्भवती महिलेसाठी आवश्यक आहेत. अक्रोडमध्ये अँटिकॉनव्हल्संट, न्युरोप्रोटिक्ट आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत, जे गर्भवती महिलांच्या वाढत्या शिशुसाठी फायदेशीर आहेत.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - सकस आहार

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: September 20, 2020, 2:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading