खूप उपयोगी आहे रुई मंदारचे फूल; या आजारावर परिणामकारक उपचार

खूप उपयोगी आहे रुई मंदारचे फूल; या आजारावर परिणामकारक उपचार

  • Last Updated: Jul 10, 2020 09:06 PM IST
  • Share this:

रुई मंदारचे फूल आकाराने छोटे आणि वाटीसारखे असते. त्याच्या आत लाल, वांगी रंगाचे ठिपके असतात. त्याच्या मुळांमध्ये मंडारएल्बन आणि फ्युएबिल नावाची रसायने असतात . हे झाड शरीराच्या अनेक आजारांवरील उपचारासाठी उपयुक्त आहे. myUpchar.com च्या अनुसार, रुई मंदार हे औषधी झाड पूर्ण भारतात कोरड्या, ओसाड आणि मोकळ्या ठिकाणी नैसर्गिकरित्या उगवतं.

चेहऱ्यावरील डाग आणि सुरकुत्या घालवते

रुई मंदारच्या चिकामध्ये 3 ग्रॅम हळद आणि गुलाब पाणी एकत्र करून हा लेप डोळ्यांना लागू न देता चेहऱ्यावर लावल्यास फायदा होतो. या लेपाने त्वचा मुलायम होते. ज्यांची त्वचा आधीपासूनच मुलायम आहे त्यांनी चेहऱ्यावर उजळपणा येण्यासाठी रुईच्या चिकाऐवजी अर्क वापरावा.

डोके आणि कानाच्या दुखण्यावरही उपयुक्त

रुई मंदारच्या फुलाचा उपयोग डोकेदुखी आणि कानाच्या दुखण्यावर उपचारासाठीही केला जातो. याचा चिक कपाळावर लावल्यास अर्धशिशीच्या दुखण्यात फायदा होतो. रुई मंदारच्या पानांचा रस कानात टाकल्यास कानाशी संबधित आजार बरे होतात. कानात मळ होणे, आवाज येणे या सारख्या समस्याही दूर होतात.

डोळ्यांसाठी याचा उपयोग असा करा

रुई मंदारची कोरडी साल कुटायची आणि ती 20 ग्रॅम गुलाब पाण्यात 5 मिनिटं टाकून ठेवायची. नंतर या गुलाबपाण्याचे 3-4 थेंब डोळ्यात टाकायचे. रुई मंदारच्या सालीनेयुक्त हे पाणी डोळ्यांसाठी खूप उपयोगी आहे. याने डोळे लाल होणे, जड होणे, दुखणे किंवा डोळे चूरचूरणे सारख्या समस्या दूर होतात.

याशिवाय मधुमालतीच्या झाडाची साल जाळून जी राख होते ती पाण्यात मिसळून लेप तयार करता येतो. हा लेप चेहऱ्यावर लावल्यास डोळ्याचा लालसरपणा, चूरचूर आणि सूज यासारख्या समस्या दूर होतात.

दाढेचे दुखणे तात्काळ दूर होते.

रुई मंदारच्या चिकात कापूस भिजवायचा आणि तो तुपात बुडवायचा नंतर तो दाढेवर ठेवायचा. याने दात आणि दाढेचे दुखणे तात्काळ दूर होते. या शिवाय अर्क दुधात मिसळून दातावर लावल्यासही दातांचे दुखणे थांबते. हलणाऱ्या दातांना अर्क घातलेले दूध लावून काढल्यास दात सहजतेने काढता येतो आणि वेदनाही कमी होतात.

श्वसन आणि खोकल्यावर उपचार

myUpchar.com च्या अनुसार, ज्या लोकांना नेहमीच श्वसन आणि खोकल्याची समस्या भेडसावत असते त्यांच्या साठी रुई मंदारचे झाड म्हणजे रामबाण उपाय आहे. रुई मंदारच्या फुलं, लवंग 50 ग्रॅम आणि चिमूटभर तिखट एकत्र करून घ्यावे. त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या कराव्या. या बारीक गोळ्या रोज सकाळी गरम पाण्यासोबत घ्याव्या. याने श्वासाशी संबधित आजार दूर होतात. याशिवाय या झाडाच्या पानावर येणाऱ्या पांढऱ्या थराच्या गोळ्या करून हा गोळ्या सकाळ संध्याकाळी पाण्यासह घेतल्यास जुना खोकला बरा होतो.

अधिक माहिती साठी वाचा आमचे लेख - https://www.myupchar.com/mr/herbs

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: July 10, 2020, 9:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading