...म्हणून पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाणं टाळा; असा असावा आहार

...म्हणून पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाणं टाळा; असा असावा आहार

पावसाळ्यात काय खावं आणि काय काय खाऊ नये, हेदेखील पाहुयात.

  • Last Updated: Jul 17, 2020 10:28 PM IST
  • Share this:

पावसाळ्यात संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका असतो. म्हणूनच खाण्यापिण्यावर विशेष लक्ष द्यायला हवे. पावसाळ्यात विशेषतः हिरव्या पालेभाज्या खाऊ नये, कारण त्यातून आपल्या शरीरात विषाणू आणि जीवाणू जाण्याचा धोका जास्त असतो. या हिरव्या पालेभाज्यांमध्ये छोटे-छोटे कीडे आणि जीवाणू असतात. भाजी कितीही धुतली तरी ते जीवाणू तसेच राहतात, म्हणून शक्यतो पावसाळ्यात पालेभाज्या खाऊ नये. आणि जर खायच्याच असतील तर मात्र त्या कोमट पाण्याने धुवून घ्याव्या.

पावसाळ्यात काय खावं आणि काय काय खाऊ नये, हेदेखील पाहुयात.

बटाटे आणि अरबी खाऊ नका

बटाटे आणि अरबीची भाजी खाऊ नये त्याने जडपणा वाटतो, पचन योग्य होत नाही परिणामी वात आणि पित्ताचा त्रास होऊ शकतो. त्यांनी संसर्गही होऊ शकतो.

कच्चे सॅलड खाऊ नये

पावसाळ्यात कच्चे सॅलड खाऊ नये. कारण कच्च्या सॅलडमध्ये अनेक जीवाणू असतात. त्याएवजी सॅलड वाफवून खाल्ले तर फायद्याचे ठरते. फळे खाताना ते आधीपासूनच कापून ठेऊ नका. जेव्हा खायची असतील तेव्हाच कापा. myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांच्या अनुसार, सॅलड प्रत्येक मोसमात चांगली आहे फक्त काळजी घेणे गरजेचे आहे.

बाहेरील पदार्थ खाऊ नका

हॉटेल आणि अन्य खाद्यपदार्थांच्या दुकानात योग्य ती साफ सफाई राखली जात नाही. त्यामुळे आजार पसरण्याचा धोका असतो, म्हणून संसर्गापासून वाचण्यासाठी बाहेरील खाद्यपदार्थ खाऊ नये. विशेषतः बाहेर मिळणाऱ्या ज्युसचे सेवन करू नका.

हर्बल चहा प्या

पावसाळ्यात वातावरण थंड असते. या वातावरणात गरमा गरम पदार्थ खाण्याची इच्छा होते. सगळ्यात प्रथम विचार येतो सकाळच्या चहाचा, त्यासाठी हर्बल चहा पिणे आरोग्य्यासाठी चांगले असते. त्यात हवेतर मिरे, आले, मध यांचा वापर केला जाऊ शकतो.

लसूण अधिक खा

myupchar.com च्या डॉ. मेधावी अग्रवाल यांच्या अनुसार, या थंड वातावरणात गरमा-गरम सूप पिणे खूप छान लागते. त्यासाठी भाज्या उकळताना त्यात लसणाच्या पाकळ्या टाकाव्यात. लसूण खाल्ल्याने रोग प्रतिकारकशक्ती मजबूत होते आणि शरीरातील विषारी घटकदेखील निघून जातात. लसणाचा उपयोग भाजीतसुद्धा करावा.

जीवनसत्व सी असलेला आहार घ्या

पावासाळ्यात पचनक्रिया कमजोर होते. त्यामुळे जीवनसत्व सी असलेल्या पदार्थांचे सेवन फायद्याचे असते. त्यासाठी संत्री, लिंबू, अॅवोकोड सारखे जीवनसत्व सी असलेले पदार्थ खाणे उत्तम आहे. ते खाल्ल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते.

आंबेही फायद्याचे आहेत

उन्हाळ्यात आंबे जास्तीत जास्त खावे. कारण पावसाळ्यासाठी ते आधीच प्रतिकारशक्ती मजबूत करून ठेवतात. आंब्यात खूप मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सीडेंट्स असतात ते रोगांशी लढण्यात मदत करतात. त्यांनी त्वचेच्या समस्या दूर होतात आणि ते पचनक्रिया मजबूत करतात.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - जीवाणूजन्य संसर्ग

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: July 17, 2020, 10:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading