नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : काही लोक परफ्यूम प्रेमी (Perfume Lover) असतात. घराबाहेर जातानाही त्यांना परफ्यूम लावायला आवडतो. तर, काहीजणांना घरातही परफ्यूम स्प्रे (Perfume Spare) आवडतो. काही लोकांना एखाद्या ठराविक ब्रॅन्डचाच परफ्यूम आवडतो.
तसं परफ्यूम वापरण्याचे बरेच फायदे (Many Benefits of Using Perfume) आहेत. त्यामुळे शरीराला येणारी दुर्गंधी (Body Oder) कमी होते. याशिवाय आपल्याला सुद्धा परफ्युम लावल्याने उत्साही (Excited) वाटायला लागतं मात्र, काही लोकांना परफ्यूम लागल्यामुळे त्रास होतो. त्यांना त्वचेवर आग, जळजळ होऊन किंवा रॅशेस यायला लागतात. बऱ्याच वेळा चुकीचा परफ्युम वापरल्यामुळे हा त्रास होऊ शकतो. तर परफ्यूम वापरताना काही जणांकडून अशाही चुका होतात की ज्यामुळे त्वचेच्या त्रासाबरोबर डोकोदुखीही होते.
1
बरेच लोक ही चूक करतात. परफ्यूम लावल्यानंतर हातावर हात घासतात. परफ्यूममध्ये केमिकल्स वापरलेले असतात. जेव्हा हातावर हात घासतो त्यावेळेस उष्णता निर्माण होते. त्यानने त्वचेला त्रास व्हायची शक्यता असते. परफ्यूम लवकर उडतो किंवा सेन्सिटीव्ह त्वचा असणाऱ्यांना जळजळीत काही त्रास होतो.
(कलरफूल आयलायनर लावताना ‘या’ चुका टाळा; मेकअप होईल खराब)
2
परफ्यूम विकत घेताना बरेच लोक स्ट्रॉंग सुवास असणारा परफ्युम खरेदी करतात. स्ट्रॉंग वासामुळे डोकेदुखी होऊ शकते. अशा वेळेस परफ्यूम अंगावर स्प्रे करण्याआधी हवेमध्ये त्याचे काही थेंब स्प्रे करावेत.
3
काहींना शरीराऐवजी कपड्यांवर परफ्यूम लावायला आवडतो. पण खरंतर परफ्यूम अंगावर लावण्यासाठी असतो कपड्याला लागला तर जास्त काळ टिकत नाही. शिवाय यातील केमिकलमुळे कपड्यांवर डाग पडू शकतात. शरीरावरच्या घामामुळे देखील कपड्यांवरचा परफ्युम लवकर उडतो.
(पावसाळ्यात वाढवा Immunity,पळतील आजार; असा असावा आहार)
4
कधीकधी परफ्यूम खरेदीसाठी गेल्यावर इतरांना आवडलेला परफ्यूम आपण खरेदी करतो. पण, इतरांपेक्षा स्वत:ला आवडणारा परफ्यूम घ्यावा. त्यातील केमिकल्सची क्वालिटी पाहूनच खरेदी करावा. शक्य असल्यास स्कीन टेस्ट करून घ्यावी म्हणजे त्रास होत नाही.
(काय म्हणावं हिला! 23 वर्षे घालतेय एकच अंडरविअर; कंजूसपणाची हद्दच केली ना राव)
5
संपूर्ण शरीरावर परफ्यूम कधीच लावू नये. यामुळे परफ्यूम वाया जातो. शिवाय त्याचा वास लवकर उडून जातो. परफ्युम अंडरआर्म, मानेच्या मागे, मनगटावर लावावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Lifestyle, Skin care