मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Beauty Tips: स्क्रब करताना या चुका टाळा; त्वचेचं होईल नुकसान

Beauty Tips: स्क्रब करताना या चुका टाळा; त्वचेचं होईल नुकसान

एंपूल हे सुपर चार्ज सिरम आहे. प्रत्येक कोरियन महिलाच्या स्किन केअर रुटीने मधलं हे सीक्रेट आहे. हे आपल्या त्वचेला बुस्ट करतं. याशिवाय हे सिरम त्वचा रिपेअर करत.

एंपूल हे सुपर चार्ज सिरम आहे. प्रत्येक कोरियन महिलाच्या स्किन केअर रुटीने मधलं हे सीक्रेट आहे. हे आपल्या त्वचेला बुस्ट करतं. याशिवाय हे सिरम त्वचा रिपेअर करत.

हेल्दी स्किनसाठी (For Healthy Skin how to use scrub) स्क्रब करणं आवश्यक आहे. पण योग्य पद्धतीने स्क्रब केलं तरच चेहऱ्यावरील डेड स्किन (Dead Skin) निघून जाते.

दिल्ली,1 जून : आपला चेहरा (Face cleaning scrub) सतेज नितळ आणि सुंदर (Beauty tips) दिसावा असं सगळ्याच महिलांना (Women)वाटतं असतं. त्यासाठी अनेकजणी मेहनत घेतात, चांगले प्रॉडक्ट वापरतात, होम रेमेडीज (Home Remedies for skin) करतात तर, काही जणी वेगवेगळे फेसपॅक (Face pack) देखील वापरत असतात चेहरा सुंदर राहण्यासाठी त्वचेची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. कोणतंही प्रॉडक्ट (Beauty Product) वापरताना किंवा होम रेमेडीज करताना त्या आपल्या चेहऱ्याला सूट होतात का? हेदेखील पाहणं महत्त्वाचं आहे.

एखादा फेस पॅक किंवा स्क्रब लावण्याची योग्य पद्धत असते. योग्य पद्धतीने चेहऱ्याची काळजी न घेतल्यास फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं.

चेहऱ्यावरची डेड स्कीन (Dead Skin) निघून जाण्यासाठी आणि त्या जागेवर नवीन त्वचा (New skin) येण्यासाठी चेहऱ्याला स्क्रब (Scrub)केलं जातं. ज्याप्रकारे चेहरा स्वच्छ करण्यासाठी फेस वॉश (Face wash)वापरणं आवश्यक आहे. तसंच आठवड्यातून एकदा फेस स्क्रब करणंही महत्त्वाचं आहे.त्यामुळे चेहर्‍यावर जमा झालेले डेड सेल्स निघून जातात. आपल्या चेहऱ्याच्या त्वचेवर पोर्समध्ये जमा झालेली घाण देखील निघून जाते. काही महिला चुकीच्या पद्धतीने स्क्रब करतात. पण आपण चुकीच्या पद्धतीने स्क्रब लावतोय आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्याला नुकसान होतंय. याची जाणीव देखील त्यांना नसते. त्यामुळेच प्रत्येकाने योग्य पद्धतीने स्क्रब करण्याची माहिती घेतली पाहिजे.

(एका छोट्याशा पक्ष्याला वाचवण्यासाठी शार्कजवळ गेला आणि...; समुद्रातील थरारक VIDEO)

कोणी वापरावं ?

चेहऱ्यावर स्क्रबिंग करण्याचं योग्य वय 25 आहे. 25 पेक्षा कमी वयाच्या लोकांनी स्क्रॅब करू नये. वयाच्या पंचविशीनंतर चेहऱ्यावर डेड सेल्स बनायला लागतात. पंचवीस पेक्षा कमी वयाच्या लोकांची स्किन हेल्दी असते. त्यामुळे चांगल्या त्वचेवर स्क्रबिंगचा फायदा होणार नाही उलट नुकसान होईल.

चेहऱ्याला दररोज स्क्रब नको

चेहऱ्यावर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा स्क्रब लावावं. दररोज स्क्रब लावू नये. मात्र 2 स्क्रबिंगमध्ये जास्त गॅपही ठेवू नये. जास्त वेळा स्क्रब केल्यास नुकसान होईल. ड्राय स्किन असलेल्यांनी आठवड्यातून एकदा आणि ऑयली स्किनवर दोन वेळा स्क्रब मसाज करणं आवश्यक आहे.

( पालकांनो सावध राहा! लहान मुलांना कोरोनाचा डबल धोका; केंद्र सरकारने केलं Alert)

स्कब लावताना चेहरा स्वच्छ असावा

चेहऱ्यावर मेकअप असेल किंवा कोणतीही घाण चेहऱ्यावरती राहिली असेल तर स्क्रब केल्यावर रोमन छिद्रांमधून घाण जाण्याऐवजी त्याचं आणखी नुकसान होतं. त्यामुळे स्क्रब लावताना चेहऱ्यावरचा मेकअप काढावा किंवा चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा.

योग्य स्क्रब

वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रब बाजारत उपलब्ध असतात. आपल्या स्किन टाईप प्रमाणे स्क्रब निवडावा काही स्क्रब चेहऱ्यावर थेट वापरू नयेत, स्क्रबमध्ये पाणी मिसळून चेहऱ्यावर लावावा.

(स्वयंपाकाशिवाय बेकिंग सोड्याचा असा करा वापर; खुलेल त्वचेचं सौंदर्य)

योग्य मसाज

चेहऱ्यावर स्क्रबने मसाज करताना हलक्या हाताने करावा. जोरात किंवा जास्त दाब देऊन स्क्रब केल्यामुळे चेहऱ्याचं नुकसान होईल. 10 ते 20 सेकंद पेक्षा जास्त वेळ स्क्रबने चेहऱ्यावर मसाज करू नये.

घरगुती स्क्रब

घरगुती स्क्रब वापरत असाल तर, तो जास्त जाड नसावा किंवा बारीकही नसावा. आपल्या चेहऱ्याला सूट होईल अशा पद्धतीचा स्क्रब वापरावा. घरगुती स्क्रब म्हणून संत्र्याची साल, पपईच्या बिया आणि साखर किंवा तांदळाचं पीठ यांचाही वापर केला जातो.

(पावसाळ्यात कोरोनाबरोबरच संसर्गजन्य आजाराची भीती; कशी घ्याल काळजी?)

टोनरचा वापर

चेहरा स्क्रब केल्यानंतर नेहमीच चेहऱ्यावरती टोनर लावणं आवश्यक आहे. घरगुती टोनर लावायचं असेल तर, टोमॅटो, काकडी, पपई यांचा रस किंवा गर तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता. याशिवाय बाजारामध्ये देखील चांगल्या प्रतीचे टोनर उपलब्ध आहेत.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Skin care