कॅन्सरचे (CANCER) बरेच प्रकार आहेत. त्यापैकी काही कर्करोग फक्त पुरुष किंवा फक्त महिलांना होतात. जसं की, स्तनाचा कर्करोग स्त्रियांमध्ये जास्त आहे, मात्र पुरुषांमध्ये याचं प्रमाण खूपच कमी आहे. पण पुरुषांना प्रोस्टेट कर्करोगाचा धोका सर्वात जास्त आहे. प्रोस्टेट कर्करोग म्हणजे काय, तो कसा होतो, त्याची कारणं, लक्षणं, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचार काय आहेत हे सविस्तर जाणून घेऊया.
प्रोस्टेट कर्करोग म्हणजे काय?
myupchar.com शी संबंधित एम्सचे डॉ. उमर अफरोज यांनी सांगितलं, शरीराच्या प्रोस्टेट ग्रंथीमध्ये उद्भवणाऱ्या कर्करोगालाच प्रोस्टेट कर्करोग म्हणतात. ही ग्रंथी शुक्राणू तयार होण्यास मदत करते. जर प्रोस्टेट कर्करोगाचं सुरुवातीच्या टप्प्यातच झालं तर त्यावर उपचार शक्य आहेत. कारण यावेळी कर्करोग सुरुवातीला प्रोस्टेट ग्रंथीपुरताच मर्यादित असतो. पण जर या कर्करोगावर वेळीच उपचार झाले नाहीत तर हा हळूहळू शरीराच्या सर्व भागात पसरतो. ज्यामुळे उपचार करणं खूप अवघड होतं. यामुळे एखाद्या व्यक्तीची स्थिती देखील गंभीर होऊ शकते.
प्रोस्टेट कर्करोगाची लक्षणं
ज्यांना प्रोस्टेट कर्करोग होतो, त्यांच्यात अगदी कमी वेळातच काही लक्षणं दिसू लागतात. यात पुरुषांना कंबरेच्या खालच्या भागात तीव्र वेदना जाणवतात. ही वेदना बर्याच काळापर्यंत चालू राहते. प्रोस्टेट कर्करोगाच्या व्यक्तीला लघवी करताना समस्या जाणवतात. लघवी कमी होणं, लघवी करताना वेदना, काही टोचल्यासारखंदेखील वाटतं. या प्रकारच्या कर्करोगामध्ये रुग्णाच्या वीर्यातून रक्तदेखील येऊ शकतं.
प्रॉस्टेट कर्करोग का होतो?
myupchar.com शी संबंधित एम्सचे डॉ. उमर अफरोज यांनी सांगितलं, प्रोस्टेट कर्करोग होण्याची अनेक कारणं असू शकतात. यासाठी मुख्य कारणांपैकी एक म्हणजे शरीराची चरबी वाढणं. याव्यतिरिक्त हा कॅन्सर आनुवंशिकदेखील असू शकतो. त्यामुळे जर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला प्रोस्टेट कर्करोग झाला असेल तर सर्व पुरुषांनी आपली तपासणी करून घ्यावी.
प्रोस्टेट कर्करोगाला प्रतिबंध कसा कराल?
प्रोस्टेट कर्करोग टाळण्यासाठी फळं आणि भाज्या अधिकाधिक प्रमाणात खाल्ल्या गेल्या पाहिजेत. जंक फूडसारखे खाद्यपदार्थ टाळावेत. तसंच तुमची जीवनशैलीही शिस्तबद्ध असावी.
वजन वाढवणारा आहार टाळला पाहिजे. मैदा, साखर यासारखे पदार्थ चरबी वाढवतात. आपल्या आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश करा. याशिवाय प्रथिनांचं प्रमाणही जास्त असलं पाहिजे.
हे वाचा - शरीराच्या 'त्या' भागावरील केस काढणं योग्य आहे की अयोग्य?
नित्यक्रम नीटनेटका ठेवण्याचा प्रयत्न करा. जसं की रात्रीच्या जेवणानंतर फिरायला जाणं, रात्रीचं जेवण झोपण्याच्या दोन तास आधी करणं जेणेकरून शरीर अन्न पचवू शकेल. यामुळे शरीरात जास्त चरबी जमा होत नाही.
कोणताही रोग टाळण्यासाठी शरीराच्या आरोग्यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम करणं आवश्यक आहे. यामुळे शरीरात कोणत्याही प्रकारचे रोग होण्याची शक्यता कमी होते.
अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - प्रोस्टेट कर्करोग: लक्षणे...
न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.