Home /News /lifestyle /

गरोदरपणात अशा भांड्यांमधलं अन्न खाणं टाळा; बाळावर होतात गंभीर परिणाम

गरोदरपणात अशा भांड्यांमधलं अन्न खाणं टाळा; बाळावर होतात गंभीर परिणाम

पुरुषांना आपल्या पत्नी बद्दल अतीप्रमाणात ओढ असते त्यांना आपल्या बाळाबद्दल देखील तितकीच ओढ आणि काळजी वाटत राहते. त्यामुळे कौवॉड सिंड्रोम दिसायला सुरुवात होते. पत्नीचं लक्ष आपल्याकडे जास्तीत जास्त असावं या भावनेमधून देखील ही लक्षणं निर्माण होतात.

पुरुषांना आपल्या पत्नी बद्दल अतीप्रमाणात ओढ असते त्यांना आपल्या बाळाबद्दल देखील तितकीच ओढ आणि काळजी वाटत राहते. त्यामुळे कौवॉड सिंड्रोम दिसायला सुरुवात होते. पत्नीचं लक्ष आपल्याकडे जास्तीत जास्त असावं या भावनेमधून देखील ही लक्षणं निर्माण होतात.

गर्भधारणेनंतर पहिले तीन महिने अधिक महत्त्वाचे असतात, कारण या महिन्यात बाळाच्या विविध अवयवांचा विकास होत असतो.

नवी दिल्ली, 7 सप्टेंबर: प्रत्येक स्त्रीसाठी गरोदरपणाचा (Pregnancy) काळ हा अत्यंत संवेदनशील मानला जातो. या काळात स्त्रीच्या शरीरात आणि मानसिक स्थितीत बदल घडून येत असतात. त्याचप्रमाणे या कालावधीत गर्भामध्ये बाळाची शारीरिक जडणघडण होत असते. त्यामुळे गर्भधारणेच्या काळात स्त्रियांनी काही नियमांचं कटाक्षानं पालन करणं गरजेचं आहे. या कालावधीत (Pregnancy care) आहार-विहारावर विशेष लक्षं द्यावं असा सल्लाही डॉक्टर्स देत असतात. या कालावधीत विशिष्ट अन्न पदार्थांचं (Food) सेवन जसं महत्त्वाचं असतं, तसंच हे अन्न पदार्थ तयार करताना काही गोष्टींकडं लक्षं देणंही गरजेचं असतं. अन्न पदार्थ तयार करताना कोणत्या भांड्यांचा वापर केला आहे, हे पाहणंही महत्त्वाचं असतं. काही भांड्यांमधील रसायनं (Chemical) ही गरोदर महिलांसाठी धोकादायक असल्याचं एका संशोधनातून स्पष्ट झालं आहे. सध्याच्या काळात प्लॅस्टिकची (Plastic) भांडयांमध्ये अन्न पदार्थ खाण्याचा नवा ट्रेंड आला आहे. गर्भवती महिलांनी या भांड्यामध्ये अन्न खाणं जोखमीचं मानलं जातं. कारण याचा विपरित परिणाम भ्रूण किंवा नवजात बालकावर होण्याची शक्यता असते. काळजी घ्या! कोरोनासोबत आता डेंग्यूचाही हल्ला, अनेक राज्यांत वाढतायत रुग्ण याबाबत स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने संशोधन केलं असून, त्यातील निष्कर्षांचं सादरीकरण अमेरिकन सोसायटी फॉर रिप्रोडक्टिव्ह मेडिसीनच्या वार्षिक चर्चासत्रात करण्यात आलं. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, प्लॅस्टिकच्या भांड्यातील अन्न सेवन करणं हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. कारण प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये अनेक प्रकारची रसायनं आढळून येतात. यामुळे गर्भपाताचा (Miscarriage) धोका वाढतो. प्लॅस्टिक भांड्यांमध्ये बिस्फेनॉल नावाचं रसायन असतं. ही भांडी उच्च तापमानावर (High Temperature) गरम केल्यास किंवा अतिगरम पदार्थ या भांड्यात ठेवल्यास हे रसायन अन्नात मिसळतं, असं संशोधक सांगतात. उंदरांवर करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, उच्च तापमान आणि गरोदरपणाचा जवळचा संबंध असतो. यामुळे बाळांमध्ये जन्मजात दोषांसह अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. उच्च तापमानामुळे गर्भातील बाळाच्या न्युरल ट्युबच्या विकासावर परिणाम होतो. गर्भधारणेनंतर पहिले तीन महिने अधिक महत्त्वाचे असतात, कारण या महिन्यात बाळाच्या विविध अवयवांचा विकास होत असतो. या कालावधीत उच्च तापमानाशी संबंध आला तर बाळात जन्मजात दोष निर्माण होण्याची शक्यता असते. ज्या पदार्थांपासून शरीरात कमीतकमी उष्णता निर्माण होते, असे पदार्थ गर्भवती महिलांनी खावेत. त्यामुळेच या काळात महिलांना तेलकट, तिखट पदार्थ, अर्धवट पिकलेली पपई, अननस आणि वांगी न खाण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. मलायका अरोराच्या Pimple free चेहऱ्याचा 'राज'; अभिनेत्रीने सांगितलं Beauty secret सर्वसामान्यपणे पाण्याची बाटली, फ्लोरिंग, फूड किंवा ड्रिंक कंटेनरमध्ये बीपीएचं (BPA) प्रमाण अधिक असतं. ही भांडी जेव्हा उच्च तापमानाच्या संपर्कात येतात किंवा ती ॲसिडिक किंवा अल्कलाइन वातावरणात ठेवली जातात, तेव्हा त्यातून बीपीए मोनोमर रिलीज होते. प्लॅस्टिकच्या भांड्यातील अन्न पदार्थ सेवन केल्यास बीपीए थेट शरीरात प्रवेश करतं. गरोदरपणात जेव्हा हे रसायन शरीरात जातं, तेव्हा याचा परिणाम भ्रूणावर किंवा नवजात शिशूवर होऊ शकतो. याचा थेट परिणाम बाळाच्या मेंदू आणि वागणुकीवर होतो. तसेच त्यांच्या वाढीवरही हे रसायन परिणाम करते. त्यामुळे गर्भवती महिलांनी प्लॅस्टिकच्या भांड्याचा वापर टाळणं हे त्यांच्यासाठी आणि होणाऱ्या बाळासाठी हितावह असतं.
First published:

Tags: Pregnancy, Pregnant woman, Woman

पुढील बातम्या