या वेळेला मेकअप कराल तर सुंदर नाही कुरूप दिसाल, चेहऱ्याचीही लागेल वाट

त्वचेवरील रंध्रांना (Pores) ऑक्सिजनची गरज असते. त्यांना मोकळा श्वास मिळावा यासाठी काही वेळा मेकअप करणं टाळायला हवं.

  • Share this:

एक्सरसाइज केल्यानंतर भरपूर घाम येतो आणि त्वचेवरील रंध्रे खुली होतात. त्यामुळे एक्सरसाइज फक्त तुमच्या शरीराला नाही तर त्वचेला सुंदर बनवतं.  मात्र जर तुम्ही मेकअप केला असेल तर मेकअप ही रंध्रे बंद करण्याचं काम करतं. त्यामुळे एक्सरसाइज करताना मेकअप करू नका.

झोपण्यापूर्वी मेकअप रिमूव्ह करायला हवा, चेहरा नीट स्वच्छ करायला हवा. मेकअप काढण्यासाठी तुम्ही मेकअप रिमूव्हर किंवा नॅच्युरल ऑइल वापरू शकता आणि त्यानंतर चेहऱ्यावर मॉईश्चरायझर लावा. यामुळे तुमच्या त्वचेच्या पेशींना पोषण मिळतं आणि त्वचेचं सौंदर्य टिकून राहतं. सकाळी उठल्यानंतरही चेहरा टवटवीत दिसतो.

चेहऱ्यावर इन्फेक्शन किंवा पिंपल्स असल्यासही मेकअप करू नका. काही मेकअप प्रोडक्ट्समध्ये एक असा घटक असतो, ज्यामुळे तुमची त्वचा जळजळेल. याशिवाय मेकअप लावण्यासाठी मेकअप ब्रश किंवा पफचा वापर करत असाल तर त्यावरही बॅक्टेरिया असू शकतात.

स्विमिंग पूलच्या पाण्यात सहसा क्लोरिन असतं. जर तुम्ही मेकअप करून या पाण्यात उतरलात तर त्याचं रिअक्शन होऊन तुम्हाला गंभीर असं इन्फेक्शन होऊ शकतं. अगदी समुद्राच्या पाण्यातही मेकअप करून उतरू नका.

सूचना - या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी देत नाही. अंमलबजावणीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 22, 2020 08:12 PM IST

ताज्या बातम्या